घरमुंबईमुंबई​त आद्यापही ३५८ खड्डे, कंत्राटदारांना उद्या पर्यंतची मुदत

मुंबई​त आद्यापही ३५८ खड्डे, कंत्राटदारांना उद्या पर्यंतची मुदत

Subscribe

मुंबई​तील रस्त्यांवर पडलेले खड्डे ४८ तासांत बुजविण्याची हमी प्रशासनाने दिल्यानंतर यंत्रणा कामाला लागली आहे. शुक्रवारी एक हजार खड्ड्यांपैकी साडेसहाशे खड्डे बुजवण्यात आले. मात्र, अद्यापही ३५८ खड्डे कायम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शनिवारी १४ जुलै रोजी सांयकाळपर्यंत संपूर्ण खड्डे बुजविण्याचे सक्त निर्देश पालिका प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत कंत्राटदारांना दिले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची तारांबळ उडाली आहे. मात्र पालिकेकडून अशी आश्वासने नेहेमीच दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईत पहिल्याच पावसांत खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या खड्डय़ातून कसरत करून प्रवास करावा लागतो आहे. याचे पडसाद पालिकेच्या सभागृहात उमटल्यानंतर पुढील ​४८​ तासांत मुंबईतील सर्व ख​ड्डे​ बुजवले जातील असे आश्वासन प्रशासन दि​ले. तसेच ​​जे कंत्राटदार चुकीच्या पध्दतीने खड्डे बुजवतील त्यांना काळ्या यादीत टाकून एफआरआय दाखल केला जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले​ होते​. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी पालिकेच्या मुख्यालयात मुख्य अभियंत्यांची कंत्राटदारांसोबत बैठक झाली. यावेळी येत्या ​४८​ तासांत खड्डे बुजवण्याची सक्त ताकीद कंत्राटदारांना देण्यात आली असल्याची माहिती मुख्य अभिय़ंता विनोद चिठोरे यांनी दिली. दरम्यान, खड्डे बुजवण्यासाठी सर्व कंत्राटदार कामाला लागले ​असून मागील महिनाभरात रस्त्यांवर ​१०३२​ खड्डे पडले त्यातील ​६७४​ खड्डे बुजवण्यात आले असून, अद्याप ​३५८​ खड्डे शिल्लक आहेत. हे खड्डे शुक्रवारी व शनिवारी ​या​ दोन दिवसांत कंत्राटदारांना बुज​वायचे असल्याने कंत्राटदारांची धावपळ उडाली आहे. तर रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी यंदा पालिकेने स्वतः कोल्डमिक्स तयार केले आहे. एकूण ​२९७.९९ टन कोल्डमिक्स तयार​ केले असून, यातील ​२९१.२१ कोल्डमिक्स खड्डे भरण्यासाठी वापर​ण्यात आले आहे. तर उर्वरित शिल्लक ४.७८ टन कोल्डमिक्स वाप​रण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यअभियंता विनोद चिठोरे यांनी दिले.

- Advertisement -

​​कंत्राटदार काळ्या यादीत-
मुंबईतील रस्त्य़ाचे काम चुकीच्या पध्दतीने कर​णाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे काम पालिकेने सुरु केले आहे. ​झोन तीनमधील मनदीप कन्स्ट्रक्शन य़ा कंत्राटदारा​ला​ पालिकेने काळ्या यादीत टाकले ​असून​ अशा चुकीच्या पध्दतीने काम करणा​ऱ्या कंत्राटदारांना यापुढेही काळ्या यादीत टाकले जा​ईल, असे सक्त आदेश​ आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -