मुंबईत मुसळधार पावसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन

pm modi cm thackeray

मुंबई शहर आणि उपनगरात मागच्या काही तासांत विक्रमी पाऊस कोसळल्यामुळे संपुर्ण मुंबईत पाणीच पाणी झाले आहे. आजवर दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर कधीही पाणी साचले नव्हते. मात्र आजच्या पावसाने चर्चगेट, वरळी अशा भागातील रस्तेही पाण्याखाली गेलेले दिसले. तर पुढच्या २४ तासांसाठी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करुन मुंबईसाठी सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.