‘कमला’ इमारत आग दुर्घटना : पंतप्रधान मोदींकडून PMNRF मधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत

आग दुर्घटनेत 23 जण जखमी झाले आहेत. या जखमींना भाटिया रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मात्र इतर जखमींना वाचवल्यानंतर त्यांना वोक्हार्ट आणि रिलायन्स रुग्णालयात घेऊन गेले असता. या दोन्ही रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिला.

मुंबईच्या ताडदेव परिसरातील कमला इमारतीत आज भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जण गंभीररित्या जखमी झालेत. दरम्यान या घटनेनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PMNRF च्या माध्यमातून आगीत मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची नुकसानभरपाई; आदित्य ठाकरेंची घोषणा

याशिवाय राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत लिहिले की, ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ज्या नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची नुकसान भरपाई दिली जाईल. यावेळी त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. याशिवाय आग दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांशी बोलून या दुःखद प्रसंगी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.


आग दुर्घटनेत 23 जण जखमी झाले आहेत. या जखमींना भाटिया रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मात्र इतर जखमींना वाचवल्यानंतर त्यांना वोक्हार्ट आणि रिलायन्स रुग्णालयात घेऊन गेले असता. या दोन्ही रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. यामुळे नकार देणाऱ्या या दोन्ही रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मात्र मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर सांगितले की, या 2 रुग्णालयांनी उपचार नाकारल्याच्या बातम्या माझ्यापर्यंत आल्या, तथापि दोन्ही रुग्णालयांनी मला कळवले की, त्यांनी या आगीत जखमी झालेल्यांपैकी काहींना दाखल केले आणि त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.


Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी