Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतील २१० अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश; अन्यथा फौजदारी कारवाईचा बडगा

मुंबईतील २१० अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश; अन्यथा फौजदारी कारवाईचा बडगा

Subscribe

मुंबई: मुंबईतील २१० अनधिकृत शाळा यंदाच्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी बंद करण्याचे आदेश पालिका शिक्षण खात्याने दिले आहेत. मात्र जर या शाळा बंद न केल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापकांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

तसेच, या २१० अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या तब्बल ६० हजार विद्यार्थ्यांना जवळच्या अधिकृत शाळांमध्ये प्रवेश देऊन सामावून घेण्यात येणार आहे. तसेच, सदर अनधिकृत शाळांमध्ये कोणत्याही पालकाने आपल्या पाल्याला पाठवू नये, याबाबत शाळेबाहेर फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.यासंदर्भातील माहिती महापालिका शिक्षण खात्याचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी दिली आहे.

- Advertisement -

मुंबईसह राज्यात अनधिकृत शाळा, अगदी महाविद्यालये व क्लासेस सुरू आहेत. मात्र मुंबईत विविध ठिकाणी तब्बल २१० अनधिकृत शाळा बिनधास्तपणे सुरू आहेत. विषेश म्हणजे या शाळांमध्ये तब्बल ६० हजार विद्यार्थी शिकत आहेत. या शाळांच्या अनधिकृत कारभाराबाबत पालक बेखबर होते. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी आपल्या मुलांना या शाळेत पाठवले. आता या शाळा अनधिकृत असल्याची बाब समोर आली आहे. पालिका शिक्षण खात्याने सदर अनधिकृत शाळांनी अधिकृत मान्यता न घेतल्याने शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. सदर शाळांना शिक्षण खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र शाळा व्यवस्थापक त्याला जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदर शाळा अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास ६० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येणार आहे.

पालिका शिक्षण खात्याने नोटिसा बजावूनही त्याची गंभीर दखल न घेतल्याने आता पालिकेने शासनाला याबाबत सूचित करून शाळा कायमस्वरुपी बंद करण्यासाठी कडक पावले उचलण्याचा व कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर शेवटच्या क्षणापर्यंत सदर अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापकांनी शाळा बंद न केल्यास पालिका फौजदारी कारवाईचा बडगा उगारणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -