घरमुंबई'जय जवान'ने मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मोडले सुरक्षेचे नियम

‘जय जवान’ने मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मोडले सुरक्षेचे नियम

Subscribe

तीन वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेला गोविंदा उत्सव यंदाच्या वर्षी यामधून बाहेर पडला असला तरी यात वयाची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ वर्षांखालील मुलांचा यात समावेश करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते

तीन वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात अडकलेला गोविंदा उत्सव यंदाच्या वर्षी यामधून बाहेर पडला असला तरी यात वयाची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ वर्षांखालील मुलांचा यात समावेश करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. यासोबत गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दहीहंडी पथक तसेच आयोजकांकडून मॅट, इन्शुरन्स, चेस्ट गार्ड, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट यासारख्या सर्व सुविधांचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र दहीहंडीची पंढरी समजल्या जाणार्‍या ठाण्यात भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या नामांकित जय जवान गोविंदा पथक तसेच स्वामी प्रतिष्ठान यांनी सुरक्षेच्या नियमांची ऐशीतैशी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या सुरक्षेचे निकष मोडून काढण्यात आले.

९ थर रचल्यामुळे जय जवानचे मुख्यमंत्र्यांनी टाळ्या वाजवून कौतुक केले खरे. पण जय जवानने आपल्या गोविंदा पथकाची कुठलीही काळजी घेतली नव्हती हेच दिसून आले. आयोजन, बक्षिसे, नाचगाणी आणि सेलिब्रेटींची उपस्थिती या सार्‍यात गोविंदाच्या जीवाचा खेळ होतोय हे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पुन्हा एकदा दिसून आले.

- Advertisement -

ठाणे शहरात लाखो रुपये बक्षिसांच्या दहीहंडींमुळे मुंबईतील नामांकित मंडळे थेट इथेतिथे न जाता ठाणे गाठतात. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, संस्कृती प्रतिष्ठान, ठाणे मनसे आणि स्वामी प्रतिष्ठान या दहीहंड्यांमध्ये यावेळी लाखालाखांच्या रोख इनामांची रेलचेल होती. यापैकी शिवाजी पाटील पुरस्कृत भाजपच्या स्वामी प्रतिष्ठान दहीहंडीत २५ लाखांचे बक्षीस असल्यामुळे जय जवानसह गोविंदा पथकांनी याच दहीहंडीला पहिली पसंती दिली. दरवर्षी किमान ९ थर रचणार्‍या जय जवानने आत्मविश्वासाच्या जोरावर स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत ९ थर रचले खरे, पण त्यांनी आपल्या गोविंदांच्या सुरक्षेचे कुठलेच नियम पाळलेले नव्हते. जय जवानच्या ९व्या थरावरील गोविंदाने हेल्मेट घातलेला नव्हता. याशिवाय आयोजकांना मॅट आणि हार्नेसची व्यवस्था उपलब्ध करून द्या ही मागणीही त्यांनी केली नाही. एका पाठोपाठ एक असे ९ थर रचत त्यांनी विजयी सलामी दिली आणि आपण महाराष्ट्रातील एक नंबरचे गोविंदा पथक असल्याचे दाखवून दिले. मात्र या सार्‍या देखाव्यात आपण आपल्या मुलांच्या जीवाची काळजी घेत नाही, हेच दाखवून दिले.

सेना-भाजपची सुरक्षेच्या नियमांना केराची टोपलीमाझगाव येथील शिवसेना शाखा क्रमांक २०९ दहीहंडीत मॅट, हेल्मेट, हार्नेस या सुरक्षेच्या वस्तूंचा वापर केलेला नव्हता. मुंबई महानगर पालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या साक्षीने हे सुरक्षेचे नियम मोडले जात होते आणि जाधव हे हसत हसत थर रचणार्‍या गोविंदा पथकांना बक्षिसे देत होते. तशीच घटना शिवाजी पार्क येथील युवा सेनेच्या दहीहंडीत दिसून आली. मॅट, हार्नेस अशा कोणत्याच सुविधा युवा सेनेकडे नव्हत्या. माहीम येथील महेश मुदलियार यांनी भाजपची जाहिरातबाजी केली खरी. पण त्यांना गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घ्यावीशी वाटली नाही.

- Advertisement -

स्पॉट विम्याचा आयोजकांना विसरदहीहंडी समन्वय समितीने अनेक आयोजकांची आणि पथकांची भेट घेऊन त्यांना इन्शुरन्स काढण्यासाठी जागरूकता निर्माण केली. यावेळी स्पॉट इन्शुरन्सचा पर्यायदेखील सांगून दिला. मात्र प्रत्यक्षात अनेक आयोजकांना याबद्दल माहिती नव्हती.

वाहतूक नियमांना बगलमुंबईतील अनेक रस्ते गोविंदा पथकांनी गजबजले होते. मात्र यावेळी पथकांनी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी गोविंदानी ट्रकची टपरी तसेच बाजूच्या पट्ट्यांवर बसून प्रवास केला. तर दुसर्‍या बाजूला अनेकांनी मोटरसायकलवरून ट्रिपल सीटने प्रवास केला. पोलीस याकडे दुर्लक्ष केल्याचे सर्वत्र दिसत होते.

 

ठाण्यातील चितळसर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत आयोजक शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेली स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी येत असल्यामुळे याच पोलीस ठाण्यात आम्ही स्वामी प्रतिष्ठान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाणे पालिका आयुक्त यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

-स्वाती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या

यंदा ९ तर पुढच्या वर्षी १० थर

स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीत ९ थर लावून ११ लाखांचे घसघशीत बक्षीस जय जवानने कमावल्यामुळे आम्ही अतिशय आनंदीत झालो आहोत. यंदा ९ थर लावून आम्हीच गोविंदाचे राजे आहोत, हे आम्ही दाखवून दिले आहे. पुढच्या वर्षी १० थर लावून आम्ही आमचाच विक्रम मोडीत काढणार आहोत.- संदीप ढवळे, जय जवान गोविंदा पथक प्रशिक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -