कस्टम विभागाकडून मुंबई विमानतळावर 9.8 कोटींचे कोकेन जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका प्रवाशाकडून तब्बल 980 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची किंमत 9 कोटी 80 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका प्रवाशाकडून तब्बल 980 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या कोकेनची किंमत 9 कोटी 80 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी कस्टम विभागाकडून संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. (mumbai international airport customs seized 980 grams of cocaine worth rs 9 8 crores)

मिळालेल्या माहितीनुसार, आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-६१० वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाला कस्टम विभागाकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याकडून 980 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी त्याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली होती. एका महिला प्रवाशाला विमानतळावर अटक करत तिच्याकडून 490 ग्रॅम कोकेन सापडले. बाजारात त्याची किंमत 4.9 कोटी रुपये आहे. ही घटना गुरुवारी घडली होती. घटनेची माहिती आता कस्टम विभागाकडून देण्यात आली आहे.

बिबट्याच्या कातडीच्या रंगाची सँडल परिधान करून महिला निघाली होती. तिची सँडल पाहून कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तिला सँडल काढण्यास सांगितली. यानंतर अधिकाऱ्यांकडून तिच्या सँडलची तपासणी करण्यात आली. या सँडलमध्ये एक विशेष पोकळी तयार करण्यात आली होती. त्यात अधिकाऱ्यांना कोकेन सापडले. कस्टम विभागानं ट्विट करून याबद्दलची माहिती आणि व्हिडीओ शेअर केला. अटक करण्यात आलेल्या महिलेबद्दलचा अधिक तपशील कस्टमकडून देण्यात आलेला नाही. ही महिला नेमकी कुठे जात होती, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कस्टम विभागाने महिलेच्या सँडलचा व्हिडीओ ट्विट केला आहे.


हेही वाचा – ‘5 जी’ आले, पण अर्थकारण बिघडले; शिवसेनेचे ‘सामना’तून मोदी सरकारवर शरसंधान