मुंबई एअरपोर्ट गुगल अर्थच्या सर्वाधिक आकर्षक स्थळांच्या यादीत

गुगल अर्थच्या माध्यमातून आढावा

Mumbai International Airport
मुंबई छत्रपती शिवाजजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ

गुगल अर्थमार्फत जगभरातील सर्वाधिक आकर्षक अशा १ हजार फोटोंची यादी ट्विटर हॅण्डलवर शेअर करण्यात आली आहे. आकाशातून सर्वात सुंदर दिसणाऱ्या विविध अशा १००० ठिकाणांचे कलेक्शन हे ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये २५०० अशी बर्ड आय व्हयुव्ह फोटोंचा समावेश आहे. जवळपास सात खंडाच्या इमेजेस या कलेक्शनमध्ये आहेत.

 

गुगल अर्थने शेअर केलेल्या इमेजेसची लिंक ट्विटर, क्रोम एक्सटेंक्शनवर उपलब्ध आहे. भारतातील जवळपास ३५ ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. त्यापैकीच एक मुंबई छत्रपती शिवाजजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेदेखील एक आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि इतर राज्यांचाही समावेश हा हाय रिझ्योल्युशन सॅटेलाईट इमेजेसमध्ये आहे.

आपल्या ग्रहावर असलेल्या सुंदर अशा ठिकाणांना गुगल अर्थचा वापर करून घेतलेला शोध हा सगळा सुखद अनुभव आहे. गुगल अर्थमुळे एक नवीन दृष्टीने हे सगळ पाहण शक्य होत आहे असे गुगल अर्थमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.