मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरील सर्व्हर डाऊन; चेक इनसाठी प्रवाशांची गर्दी

mumbai airport international traveller have to reach at least three and half hours before

देशातील सर्वात मोठ्या एअरपोर्टपैकी एक असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवरील सर्व्हर अचानक डाऊन झाले आहे, यामुळे मागील 20 मिनिटांपासून चेक इन करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. कॉम्प्युटर सिस्टममध्ये झालेल्या बिघाडामुळे चेक इनसाठी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. नियोजित फ्लाईट्स बुकिंग असतानाही चेक इनसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक प्रवाशांनी आता ट्विटरवर याबाबत तक्रारी केल्या आहेत.

अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने येथील कॉम्प्युटर सिस्टमही चालत नाहीत, यामुळे आता विमानतळ प्रशासनाकडून तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. थोड्याच वेळात ही सिस्टम पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. एअरपोर्टचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन झाल्यामुळे प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम ठप्प झाले आहे. यामुळे प्रवाशांची तपासणी, बॅगेज काऊंटर, चेक इन, बोर्डिंग पास देण्याची सर्व्हिस पूर्णपणे थांबली आहे.

सोशल मीडियावर प्रवाशांच्या तक्रारीनंतर एअर इंडियाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एअर इंडियाने म्हटले की, आम्हाला समजते की, हा विलंब नक्कीच गैरसोयीचा आहे. आमची टीम गैरसोय कमी करण्यासाठी काम करत आहे. पुढील अपडेट्ससाठी ते तुमच्या संपर्कात असतील.

CISF ने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पदभार स्वीकारला आहे. सीआयएसएफने सांगितले की, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन असल्यामुळे गर्दी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात असून मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही.


ठाणेकरांनी योजनेचा लाभ घेऊन पाणी बिलाचा त्वरित भरणा करावा, आयुक्तांचे आवाहन