घरताज्या घडामोडीMumbai International Airport : विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनाला आग ; मोठी दुर्घटना...

Mumbai International Airport : विमानाला पुशबॅक करणाऱ्या वाहनाला आग ; मोठी दुर्घटना टळली

Subscribe

विमान मुंबईहून जामनगरला निघाले होते. दरम्यान, या विमानाला रनवेवर ढकलण्यासाठी हे पुशबॅक वाहन विमानाला जोडण्यात येत होते. मात्र याचवेळी अचानकपणे प्रवाशांनी भरलेल्या विमानाजवळ पुशबॅक वाहन असतानाच पेट घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाला पुशबॅक करण्यासाठी आलेल्या वाहनाला भीषण आग लागली आहे. हे विमान प्रवाशांनी भरलेले होते. मात्र ही भीषण आग लागली असून, मोठी दुर्घटना टळली आहे. हे 657 क्रमांकाचे विमान मुंबईहून जामनगरला निघाले होते. दरम्यान, या विमानाला रनवेवर ढकलण्यासाठी हे पुशबॅक वाहन विमानाला जोडण्यात येत होते. मात्र अचानकपणे प्रवाशांनी भरलेल्या विमानाजवळ असतानाच पुशबॅक वाहनाने पेट घेतला.

- Advertisement -

घटनास्थळी तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. ही दुर्घटना घडताच विमाना शेजारीच असणाऱ्या दुसऱ्या पुशबॅक वाहनाच्या मदतीने विमानाला आगीपासून दूर करण्यात आले. त्यानंतर मुंबई विमानतळावरील अग्निशमन यंत्रणांच्या मदतीने पुशबॅकची भीषण आग विझवण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार, या पुशबॅक वाहनाच्या दुर्घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमान हे संपूर्ण प्रवाशांनी भरलेले होते. त्यामुळे वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र ही आग नक्की कशामुळे लागली याचा अद्यापही शोध लागला नसून, तपास यंत्रणेचा शोध सुरु आहे.


हे ही वाचा – IND vs SA Playing XI: तिसऱ्या टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हन काय? पाच माजी खेळाडूंच्या टीममध्ये कोण इन कोण आऊट?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -