जुहू चौपाटी येथील समुद्रात तिघेजण बुडाले; एकाला वाचवण्यात यश

मुंबईतील (Mumbai) जुहू चौपाटी (Juhu Chowpati) येथील समुद्रात तिन जण बुडाल्याची (3 male drowned) धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Drawn
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईतील (Mumbai) जुहू चौपाटी (Juhu Chowpati) येथील समुद्रात तिन जण बुडाल्याची (3 male drowned) धक्कादायक माहिती समोर येत आहे. मंगळवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित जीवरक्षकांनी त्यांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. (mumbai juhu chowpati 3 male drowned in the Sea)

अमन सिंग (२१), कौस्तुभ गणेश गुप्ता (१८), प्रथमेश गणेश गुप्ता अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. सांतक्रुझच्या जे डब्ल्यू मॅरियेटच्या मागील परिसरात असलेल्या जुहू समुद्रकिनारी ही तीन खेळत होती. त्यानंतर समुद्रातील लाटांचा आनंद लुटण्यासाठी ते समुद्रात गेले. मात्र पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याचे समजते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपस्थित जीवरक्षक मनोहन शेट्टी यांनी बचावकार्य केले. या बचावकार्यादरम्यान तिघांपैकी एकाला वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा – वडाच्या झाडाच्या फांद्या तोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार; पालिका करणार गुन्हा दाखल