घरCORONA UPDATEकेईएममध्ये डॉक्टरला कोरोना; हॉस्पिटलमध्येच करण्यात आले क्वॉरंटाईन

केईएममध्ये डॉक्टरला कोरोना; हॉस्पिटलमध्येच करण्यात आले क्वॉरंटाईन

Subscribe

केईएममधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले असून या डॉक्टराला केईएम हॉस्पिटलमध्येच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच आता केईएममधील एका ४७ वर्षाच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. हा डॉक्टर वरळीतील रहिवासी असून या डॉक्टराला केईएम हॉस्पिटलमध्येच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

डॉक्टर प्रत्यारोपणासाठी रजेवर 

केईएम रुग्णालयामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकरी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. या डॉक्टराची नुकतीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यासाठी हा डॉक्टर अनेक दिवसांपासून रजेवर होता. दरम्यान, डॉक्टराच्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण झाल्यामुळे डॉक्टरची कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती आणि वरळीमध्ये सापडत असलेले कोरोनाचे रुग्ण यामुळे डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या डॉक्टरवर केईएम हॉस्पिटलमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. डॉक्टर प्रत्यारोपणासाठी रजेवर असल्याने हॉस्पिटलमधील कोणत्याही कर्मचाऱ्याला धोका नसल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनामुळे ‘या’ राज्याने वाढवला लॉकडाऊन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -