Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई कोरोना रुग्णावर आली ऑक्सिजन बेड मागण्याची वेळ, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

कोरोना रुग्णावर आली ऑक्सिजन बेड मागण्याची वेळ, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे मुंबईत अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या अपुरी पडत आहे. यामुळे मुंबईत अनेक रुग्णांना सध्या ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी अडचणी येत आहे. यात एका तरुणीने मुंबईत कोरोना रुग्णाला उपाचारासाठी ऑक्सिजन बेड मिळत नसल्याचे ट्विट पालिकेला केले होते. या ट्विटची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोरोना रुग्णाचा मदतीला धावून आल्य़ा आहेत. सुप्रिया सुळेंचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

मुंबई वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोविड सेंटरसह खासगी रुग्णालयातील अनेक ऑक्सिजन बेड फुल्ल झालेत. त्यामुळे नव्याने भर्ती होणाऱ्या अतिगंभीर रुग्णांना ऑक्सिजन बेड्स अपुरे पडत आहेत. दरम्यान चेंबुरमध्ये राहणाऱ्या एका ६८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला किडनी आणि ह्रदयविकारासंबंधीत आजार होते. त्यामुळे अतिगंभीर अवस्थेत असणाऱ्य रुग्णाला तात्काळ बेडची गरज होती. यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये आयसीयू बेड्सचा शोध घेतला. परंतु या रुग्णाचा नातेवाईकांना ऑक्सिजन बेड तात्काळ उपलब्ध झाला नाही. यानंतर एका तरुणीने याबाबतची माहिती पालिकेला ट्विटरच्या माध्यमातून देत मदत मागितली. यानंतर या तरुणीच्या ट्विटरची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी घेत लगेच प्रतिसाद दिला. सुप्रिया सुळे यांनी तरुणीच्या ट्वीटला उत्तर देत लिहिले की, बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटरला ऑक्सिजन बेड उपलब्ध असून तिथल्या कोविड सेंटरच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचंही म्हणत तात्काळ तेथे जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या ट्वीटला उत्तर देताना या तरुणीनं सर्वांचे आभार मानले आहेत, व रुग्णाला बेड मिळाल्याची माहितीही दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान सुप्रिया सुळेंनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही तरुणीच्या ट्विटरला तात्काळ उत्तर देत पालिकेला बेड्स उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. तर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी याची दखल घेत या तरुणीचे ट्विट महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टॅग करत मदतीचे आवाहन केले.


 

- Advertisement -