घरताज्या घडामोडीमुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्राकडे पावसाची अजूनही पाठच

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्राकडे पावसाची अजूनही पाठच

Subscribe
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये पावसाची तशी अजूनही पाठच असून मागील दोन वर्षांच्या तुलनेत या सर्व तलाव क्षेत्रात सरासरी निम्मा पाणी साठा जमा झाला आहे. २९ जुलैपर्यंत या तलावांत ५ ते ६ लाख लिटर अर्थात ५० ते ६० हजार कोटी लिटर एवढा कमी पाण्याचा साठा कमीप्रमाणात जमा झाला आहे.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी आदी तलाव तसेच धरणांमधून दरदिवशी होणाऱ्या ३,८५०  दशलक्ष लिटर अर्थात ३८५ कोटी लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा होता. मात्र तलाव क्षेत्रात मागील जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यांत पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली असली तरी ती समाधानकारक नाही. २९ जुलै रोजी यासर्व तलावांत ४ लाख ८५ हजार दशलक्ष अर्थात ४८ हजार ५०८ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे.

४ जुलै रोजी यासर्व तलावातील पाणीसाठा हा १ लाख ९ हजार ७ दशलक्ष लिटर एवढा होता. २९ जुलै रोजी हा पाणी साठा सर्व तलावांत ४ लाख ८५ हजार दशलक्ष अर्थात ४८ हजार ५०८ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा जमा झाला आहे. तर २९ जुलै २०१९ रोजी हा पाणी साठा ११ लाख ३० हजार दशलक्ष अर्थात १ लाख १३ हजार कोटी लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला होता, तर त्याआधीच्या वर्षी म्हणजेच २९ जुलै २०१८ रोजी १२ लाख ७ हजार दशलक्ष लिटर अर्थात १ लाख २७ हजार कोटी लिटर एवढा पाणीसाठा जमा झाला होता. मात्र, मागील दोन वर्षातील तलावांत जमा होणाऱ्या पाणीसाठ्याचा अंदाज घेतला तर अजूनही ५ ते ६ लाख लिटर अर्थात ५० ते ६० हजार कोटी लिटर पाण्याचा साठा कमी प्रमाणात जमा झाला आहे. मुंबईतील वर्षभराची पाण्याची तहान ही १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४४ हजार कोटी लिटर एवढी आहे. त्यातुलनेत २९ जुलै पर्यंत केवळ ३३.५१ टक्के एवढाच पाणी साठा उपलब्ध आहे. परंतु एवढा पाणी साठा असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळून पाण्याच्या एकूण साठ्यात वाढ होईल. पण सध्या तरी चिंता करण्याची गरज नसून ३१ सप्टेंबर महिन्यात जो पाणी साठा असेल त्यावर पुढील वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत पाण्याचे पुढील संकट काय असेल हे चित्र स्पष्ट होईल.

२९ जुलै २०२०: ४ लाख ८५ हजार दशलक्ष अर्थात ४८ हजार ५०८  कोटी लिटर (३३.५१ टक्के)
२९ जुलै २०१९: ११ लाख ३० हजार दशलक्ष अर्थात १ लाख १३ हजार कोटी लिटर (७८.०८ टक्के)
२९ जुलै २०१८: १२ लाख ७ हजार दशलक्ष लिटर अर्थात १ लाख २७ हजार कोटी लिटर (८३.४६ टक्के)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -