Mumbai Local : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंट्राग्राफमध्ये स्पार्क

ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.

Mumbai Local harbour railway delayed due to spark in pantograph near kopar railway station
Mumbai Local: हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकी विस्कळीत; पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंट्राग्राफमध्ये स्पार्क

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकी विस्कळीत (Mumbai Local) झाली असून प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. पावसाच्या हलक्या सरींमुळे पेंट्राग्राफमध्ये स्पार्क झाला. स्पार्कमुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे सकाळी कामाला निघालेल्या मुंबईकरांना हार्बर मार्गावरून (Harbour Railway Live Update) प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान या मार्गावरून धावणाऱ्या इतर लोकलचं वेळापत्रक देखील खोळंबले आहे. सध्या हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ही 20 ते 25 मिनिटे उशीराने सुरु आहे. (Harbour Railway)

आज सकाळपासून हार्बर रेल्वे मार्गावर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. या हलक्या पावसाच्या सरींमुळे रेल्वेच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड सुरु झाला. सकाळी वाशी स्थानकातही गोरेगाव अप मार्गावरील रेल्वे अनेक मिनिटे स्थानकातचं उभी होती. त्यामुळे बेलापूर, बदलापूरपासून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, ऐन सकाळी कामाला जाण्यास वेळेस लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. (Mumbai Local Train Running Late)

ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने ही अवस्था झाल्याने, पावसाला खरी सुरुवात झाल्यावर काय परिणाम होणार, असा प्रश्न अनेक प्रवासी उपस्थित करत आहेत.

दरम्यान मुंबईतील खार रोड, वांद्रे, दादर, माहिम, माडुंगा रोड या भागांसह अनेक भागात आज सकाळपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाला. परिणामी हार्बर रेल्वेमार्गावरील वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अनेक ट्रेन्स ट्रॅकवर जागच्या जागी थांबून राहिल्या. आता हा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र  हार्बर रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.


QUAD Summit 2022 : जपानी मुलाचे हिंदी ऐकून PM मोदी झाले अचंबित, विचारला ‘हा’ प्रश्न