Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक जाहीर

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक जाहीर

Subscribe

मुंबई मध्य रेल्वेचा रविवारी १६ मे २०२१ रोजी मेगाब्लॉक आहे. देखभाल आणि दुरुतीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे रविवारच्या रेल्वे वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहे. यामुळे रविवारी मुंबईकरांना प्रवास करताना विविध अडचणी येणार आहेत. हा मेगा ब्लॉक सकाळी ११ ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु असणार आहे. त्यानंतर सर्व रेल्वेसेवा सुरळीत होणार आहे. हा मेगा ब्लॉक मध्य रेल्वे आणि मुंबई विभागावर लागू केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणा-या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकापासून धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी १०.२७ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप धिम्या मार्गावरुन सुटणा-या उपनगरी गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार असून भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. पुढे माटुंगा येथे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येईल.

कुर्ला- वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

- Advertisement -

कुर्ला-वाशी अप व डाउन हार्बर मार्गावरही रविवारी (१६ मे २०२१) सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा व पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल – वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ४.३० या वेळेत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी असेल.


Mumbai Corona Update: मुंबईत आज १६५७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर २५७२ रुग्ण कोरोनामुक्त


- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -