रेल्वे प्रवाशांनो, रविवारी घराबाहेर पडण्याआधी वाचा ‘हे’ मेगाब्लॉकचं वेळापत्रक

mumbai local news central railway western railway and harbour line to hold mega block today sunday

मुंबईतील रेल्वे प्रवाशांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचं (Mumbai Local Mega Block) वेळापत्रक वाचूनचं बाहेर पडा. कारण रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर 2022 रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने याबाबत माहिती दिली आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड या अप आणि डाऊन फास्ट मार्गावर सकाळी 11.05 पासून ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.25 ते 3.35 पर्यंत सुटणाऱ्या गाड्या माटुंगा ते मुलुंड मार्गावरील स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे ठाण्याच्या पुढे फास्ट गाड्या या 15 मिनिटे उशारीने धावतील.

रविवारी हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गोरेगाव ते पनवेल आणि बेलापूर या अप मार्गावर सकाळी 10.33 ते दुपारी 3. 49 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पनवेल, बेलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 दरम्यान मेगाब्लॉक असेल. यामुळे या मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. या मेगाब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान काही विशेष गाड्या धावतील.

दरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हररे़ड उपकरणांच्या दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी 12 नोव्हेंबर आणि रविवारी 13 नोव्हेंबर रोजी वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गावर 11.50 ते 02.50 आणि जलद मार्गांवर 01.30 ते 04.30 पर्यंत रात्रीचा ब्लॉक असेल. अशी माहिती वेस्टर्न रेल्वेने दिली आहे.


उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी; भाजपा नेत्याचं टीकास्त्र