प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड

mumbai local updates technical failure at dadar railway station central railway local service to csmt delayed

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वे उशीराने धावत आहे. त्यामुळे कामानिमित्त मध्य रेल्वेने प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा होत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे दादर ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूकीवर विशेष परिणाम जाणवत आहे. मध्य रेल्वेच्या अनेक एक्सप्रेस दादर स्थानकावर अडकून पडल्या आहेत. ज्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशीराने सुरु आहेत. ऐन कामाच्या वेळेत मध्य रेल्वेत झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे आता प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान प्लॅटफॉर्मवर देखील प्रवाशांची गर्दी पाहयला मिळत आहे.

दरम्यान रेल्वे प्रशानसाकडूनही या तांत्रिक बिघाडाबाबत ट्विटरद्वारे माहिती देण्यात आली आहे. तसेच याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. रेल्वे प्रशासनाने ट्विट करत म्हटले की, दादर स्टेशनवर सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने मेन लाइनवरील गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी, अधिकारी यांच्यामार्फत तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरु असून लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत केली जाईल.

मध्य रेल्वेच्या उशीराने सुरु असलेल्या वाहतूकीमुळे डोंबिवलीसह अनेक मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. यात अनेक एक्स्प्रेस गाड्यांनाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसलाय. एकामागोमाग एक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या दादार स्थानकावर थांबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मात्र या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेचे सकाळचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मध्य रेल्वेवर उशीराने सुरु असलेल्या वाहतूकीमुळे आता प्रवाशांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे अनेक प्रवासी आता टॅक्सी, रिक्षा अश्या पर्यायी व्यवस्थेचा वापर करत आहे. मध्य रेल्वे मार्गावरून दररोज लाखो प्रवासी दादरच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेने हा बिघाड लवकरात लवकर दुरुस्त केला नाही तर मध्य रेल्वेचे वेळापत्रक आणखी कोलमडण्याची शक्यता आहे.


ढोकळा… ठेचा… खोक्यांचा हिशेब…, ठाकरे-शिंदेंमध्ये रंगला सामना