रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर ‘या’ वेळेत असेल मेगा ब्लॉक

megablock on central railway
megablock on central railway

शनिवारी रात्री मुंबई लोकल प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. विकेन्डच्या दिवशी घराबाहेर पडण्याचा प्लॅन केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मध्य व पश्चिम रेल्वेने शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक घोषीत केला आहे त्यानुसार रेल्वेकडून मेगा ब्लॉकच वेळापत्रक देण्यात आले आहे.21/22.5.2022 रोजी मध्यरात्री मुख्य मार्गावर रात्रीचा मेगा ब्लॉक तसेच हार्बर मार्गावर रविवार दि. 22.5.2022 रोजी मेगा ब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे मुंबई विभाग रविवारी अभियांत्रिकी आणि देखभालीची करण्यासाठी उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक चालवणार आहे. शनिवारी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत भायखळा- माटुंगा अप जलद मार्गावर आणि सकाळी 00.40 ते 5.40 पर्यंत भायखळा- माटुंगा दरम्यान डाउन जलद मार्गावर. सकाळी ५.२० वाजता ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन आपल्या वेळापत्रकानुसार थांब्यांवर थांबेल आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.

21.5.2022 रोजी रात्री 10.58 ते रात्री 11.15 पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवली जाईल. या गाड्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि गंतव्यस्थानावर 10मिनिटे उशिराने पोहोचतील. पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित राहणार नाहीत. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील.