मुंबईतील लॉकडाऊन जुलैपर्यंत राहणार?

All establishments in Sangamnera closed till May 26
लॉकडाऊन वाढवला

राज्यासह देशात सध्या लॉकडाऊन – ४ सुरू असून, देशातील हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत घेण्यात आला आहे. मात्र ‘दै. आपलं महानगर’ला खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये जुलै महिन्यापर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मुंबईमध्ये लॉकडाऊन असताना देखील रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊन आणखी वाढवण्याच्या विचारात उद्धव ठाकरे सरकार आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने तशी तयारी देखील केली असून, पुढील दोन महिन्यांचा मास्टरप्लान देखील तयार करण्यात आला आहे. दिवसेंदिवस वाढणारी मुंबईतील करोना रुग्णांची आकडेवारी ही राज्य सरकारची डोकेदुखी ठरत आहे. जून आणि जुलै महिन्यात मुंबईमध्ये रुग्णांची आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरू ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणार्‍या शाळांना ती मुभा नसेल असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. मात्र यावरून ठाकरे सरकारमध्ये दोन गट असल्याचे पहायला मिळत असून, काही नेत्यांनी शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे. मुंबईत सप्टेंबरपर्यंत शाळा सुरू करता येणार नाहीत, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

त्यातच जर लॉकडाऊन उठवण्याची घाई केल्यास मुंबईमध्ये करोनाचे रुग्ण अधिक वाढू शकतात. त्यामुळे जोपर्यंत मुंबईमध्ये करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत मुंबईतील लॉकडाऊन उठणे शक्य नसल्याचे एका मंत्र्याने ‘दै. आपलं महानगर’शी खासगीत बोलताना सांगितले. मुंबईत सध्या झोपडपट्ट्यांमध्ये करोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढत आहे. त्यातच पावसाळ्यात साथीचे आजार आणि करोनाची साथ यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू शकतो. याचमुळे किमान जुलै महिन्यापर्यंत तरी ठाकरे सरकार मुंबईतील लॉकडाऊन उठवण्याच्या तयारीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

शाळा सुरू करण्यावरून दोन गट

राज्यात करोनाच्या संकटात शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. अशात आता १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्यानंतर आठवड्यातले ४८ तास त्या सुरू ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणार्‍या शाळांना ती मुभा नसेल असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. मात्र यावरून ठाकरे सरकारमध्ये दोन गट असल्याचे पहायला मिळत असून, काही नेत्यांनी शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला आहे. मुंबईत सप्टेंबरपर्यंत शाळा सुरू करता येणार नाहीत, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.

मुंबई वगळता राज्यातील इतर ठिकाणी व्यवहार सुरू होणार

मुंबईमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्याचा विचार राज्य सरकार करत असले तरी देखील जे भाग नॉन रेड झोनमध्ये आहेत तेथे सर्व व्यवहार कायम सुरू ठेवणार आहे. या भागामध्ये आणखी नवे उद्योग कसे सुरू करता येतील यासाठी देखील राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. तसेच मुंबईतील कंटेन्मेंट झोन वगळता नॉन कटेन्मेंट झोनमध्ये काही व्यवहार सुरू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.