घरमुंबईमहाराष्ट्र पोलिसांनी जारी केला अलर्ट; नागरिकांना मरीन ड्राईव्हवर न येण्याचे आवाहन

महाराष्ट्र पोलिसांनी जारी केला अलर्ट; नागरिकांना मरीन ड्राईव्हवर न येण्याचे आवाहन

Subscribe

महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर हाय टाईडची शक्यता असून लोकांना किनाऱ्याजवळ न जाण्यास सांगितले आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून आज समुद्राला भरती येणार असल्याचे मोठ्या लाटा उसण्याची शक्यत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरूवात झाली असून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडून गेला आहे. सध्या पावसाची उघडझाप सुरू असती तरी येत्या काळात जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात

काल मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरू असतानाच दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाची रिमझिम सुरुच होती. मुंबईत दिवसभरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहरात ३७.४३ मि.मी, पश्चिम उपनगरात ३४.०४ मि.मी आणि पूर्व उपनगरात ५२.६ मि.मी एवढा पाऊस कोसळला. मात्र, पुढील २४ तासांमध्ये आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनमध्ये आणखी सुधारणा होत महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आता राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

आर्थिक मंदीच्या काळात ‘या’ ठिकाणी ‘पार्ले-जी’चे उत्पादन २० ते २५ टक्क्यांनी वाढले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -