घरCORONA UPDATE'Coronavirus हे सरकारी षडयंत्र' अशी फेसबुक पोस्ट करणाऱ्याला मुंबईत अटक

‘Coronavirus हे सरकारी षडयंत्र’ अशी फेसबुक पोस्ट करणाऱ्याला मुंबईत अटक

Subscribe

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात सोशल मीडियावरून अफवा किंवा चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानंतर आता गृहखाते चांगलेच सक्रीय झाले असून मुंबईच्या चुनाभट्टी येथून एका ३६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ‘कोरोना व्हायरस हे सरकारी षडयंत्र असून लोकांनी आपली माहिती सरकारी यंत्रणांना देऊ नये’ अशा आशयाची पोस्ट या व्यक्तीने केली होती.

ही पोस्ट फेसबुकवर टाकल्यानंतर यंत्रणांनी या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा कुर्ला येथील कुरेशी नगरचा रहिवासी शमीम इफ्तेकार खान हा फेसबुक युजर असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर त्याला चुनाभट्टी येथून ताब्यात घेण्यात आले. शमीमने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘कोरोना व्हायरस हा अस्तित्वातच नाही. केवळ विशिष्ट समुदायाला छळण्यासाठी याचा बागुलबुवा उभा केला गेला आहे. तसेच कोरोनाच्या बाबतीत जर सरकारी यंत्रणा आपली माहिती मागत असतील तर ती देऊ नका’

- Advertisement -

आरोपीने ही पोस्ट टाकल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम १८८ आणि ५०५ नुसार गुन्हा दाखल करत अटक केली. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील काही युवकांना देखील अशाच प्रकारे चुकीच्या पोस्ट केल्याबद्दल अटक केली होती. एका विकृताने नोटा तोंडाला, नाकाला पुसत ही अल्लाने दिलेली शिक्षा असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -