मुंबई-मांडवा वॉटर टॅक्सी प्रवास आता करा फक्त 250 रुपयांत; आजपासून नवे दर लागू

Mumbai Mandwa water taxi services at just Rs 250 New rates applicable from 16 november

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, येणाऱ्या पर्यटकांना आपल्या सौंदर्याची भुरळ घालणाऱ्या अलिबागच्या मांडवा किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. यामुळे पर्यटकांना आकर्षक करण्यासाठी मुंबई ते मांडवा अशी भारतातील पहिली 200 प्रवासी क्षमतेची हाय स्पीड वॉटर टॅक्सी सेवा करण्यात आली. ही टॅक्सी सेवा सुरु होऊन दोन आठवडे झाले, मात्र तिकिटामुळे सेवेला मिळणारा प्रतिसाद कमी आहे. अशा परिस्थिती आता मुंबई- मांडवा वॉटर टॅक्सीकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठची तिकीटांच्या दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे 400, 450 रुपयांचे तिकीट अनुक्रमे आता 250, 350 रुपयांनी मिळणार आहे. ही तिकीट दर कपात आजपासून (16 नोव्हेंबर) लागू होत आहे. ज्यामुळे पर्यटकांना आता मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी प्रवास फक्त 250 रुपयांपासून करता येणार आहे. (Mumbai Mandwa water taxi services at just Rs 250 New rates applicable from 16 November)

मुंबई सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरणाने प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित करण्यासाठी जलवाहतूक सेवांना प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार विविध जलमार्गांवर रो- रो आणि वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली जात आहे. याच भाग म्हणून मुंबई डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल – मांडवा अशी 200 प्रवाशी क्षमतेची वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली. या सेवेमुळे मुंबईहून मांडव्याला केवळ 40 ते 45 मिनिटांत पोहचणे शक्य झाले आहे. मुंबई ते मांडवा आणि मांडवा ते मुंबई अशी दिवसाला सहा फेऱ्या होतात. देशातील सर्वात मोठ्या वॉटर टॅक्सीमुळे पर्यटकांसह प्रवाशांना प्रवास जलद आणि सुरक्षित पोहचणे शक्य झाले आहे.

मात्र ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु होऊन दोन आठवडे उलटले तरी मिळणारा प्रतिसाद कमी आहे. जास्त तिकीट दरामुळे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची 200 प्रवाशी क्षमतेची ही वॉटर टॅक्सी सेवा चालवत आहे. या कंपनीच्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यात फक्त 2403 प्रवाशांनी यातून प्रवास केला. आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी तिकीटाचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मुंबई – मांडवा वॉटर टॅक्सीच्या दरात 100 ते 150 रुपयांची कपात करण्यात आली आहे. ही नवीन दरवाढ 16 नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. ज्यानुसार 400 रुपयांचे तिकीट केवळ 240 आणि 450 रुपयांचे तिकीट 350 रुपयांत मिळणार आहे.


हेही वाचा : नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश