Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Mumbai rain : मुंबईकरांनो येत्या २४ तासांत पुन्हा जोरदार पाऊस !

Mumbai rain : मुंबईकरांनो येत्या २४ तासांत पुन्हा जोरदार पाऊस !

Related Story

- Advertisement -

हवामान खात्याने पुढील २४ तासांत मुंबईत ढगांच्या गडगडाटासह मध्यम, जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अतिवृष्टी होणार असलेल्या ४ दिवसांपैकी पहिलाच दिवस भारी पडला आणि मुंबईकरांचे चांगलेच हाल झाल्याने आता सावध मुंबईकर उद्या कामाला घराबाहेर पडण्यापूर्वी पावसाचा अंदाज घेऊन पूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडेल. अथवा पावसाचा जोर दिसल्यास घराबाहेर न जाता घरातच उद्याचा दिवस काढण्याचा प्रयत्न करेल,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

समुद्राला गुरुवारी मोठी भरती

गुरुवारी दुपारी १२.१७ वाजता समुद्रात मोठी भरती असून समुद्रात ४.२६ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर सायंकाळी ६.१४ वाजता ओहोटी असून त्यावेळी समुद्रातील लाटांची उंची १.९४ मिटर इतकी असणार आहे. त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास मुंबईत सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असते. तसे झाल्यास मुंबईकरांना उद्याही ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा, रेल्वे व रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

घर, झाडे यांची पडझड

- Advertisement -

मुंबईत मुसळधार पावसामुळे शहर भागात – ५ ठिकाणी, पश्चिम उपनगरात – ८ ठिकाणी तर पूर्व उपनगरात – १९ ठिकाणी अशा ३२ ठिकाणी झाडे/ फांद्या यांची पडझड झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र या घटनांत कोणीही जखमी झालेला नाही.
तसेच, शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरे या ठिकाणी प्रत्येकी २ याप्रमाणे ६ ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

१४ ठिकणी शॉर्टसर्किट

मुसळधार पावसामुळे शहर भागात ९ ठिकाणी , पश्चिम उपनगरात – २ ठिकाणी आणि पूर्व उपनगरात – ३ ठिकाणी अशा १४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही.

- Advertisement -

मुंबईत पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी वीतभर ते हातभर पाणी साचल्याने रेल्वे व रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम होऊन वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे लाखो प्रवाशांना त्याचा मोठा मनःस्ताप झाला.
तसेच, बेस्ट परिवहन विभागाच्या ३ हजार ३४९ बसगाड्या रस्त्यावर धावत होत्या. त्यापैकी ५० पेक्षाही जास्त बसगाड्या या विविध ठिकाणी पाणी साचल्याने बंद पडल्या. त्यामुळे या बसगाड्यांमधील प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला.
त्याचप्रमाणे,२६ ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ४६ बसगाड्यांची वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वाळवावी लागली. त्यामुळेही बेस्टमधील प्रवाशांना त्याचा त्रास झाला.

याठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने बस वाहतूक वळवली

हिंदमाता, किंग्जसर्कल, सायन सर्कल दहिसर, मानखुर्द स्टेशन , सायन रोड – २४, अँटॉप हिल, गांधी मार्केट, बैलबाजार, शीतल सिनेमा, कल्पना सिनेमा, पिंकी सिनेमा, एअर इंडिया कॉलनी, एस. व्ही. रोड, आरसीएफ कॉलनी, अंधेरी मार्केट, अजित ग्लास, वांद्रे, खोदाद सर्कल, चुनाभट्टी, गोरेगाव, सिद्धार्थ नगर, मराठा कॉलनी, वेस्टर्न हायवे, बेहराम बाग, मंडाला आणि ओशिवरा आदी २६ ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बस गाड्यांची वाहतूक वळविण्यात आली.


 

- Advertisement -