घरमुंबईमुंबई महापौरांकडून पुन्हा रस्त्यावर उतरून मास्कबाबत जनजागृती

मुंबई महापौरांकडून पुन्हा रस्त्यावर उतरून मास्कबाबत जनजागृती

Subscribe

रस्त्यावर उतरुन मास्कबाबत जनजागृती करणे हे आद्य कर्तव्य - महापौर पेडणेकर

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा रस्त्यावर उतरुन नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. आज(मंगळवार,२३ फेब्रुवारी) सकाळी ७.३० वाजता मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी दादरच्या भाजीमार्केटची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाजीविक्रेते तसेच नागरिकांना मास्क वापरण्याचे आणि सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वारंवार नागरिकांना मास्क आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. काहीदिवसांपूर्वी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकल प्रवास करत प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन केले होते.

मुंबई महपौर किशोरी पेडणेकर नेहमीच नागरिकांना कोरोनावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करण्यास सांगत असतात. सकाळीच महापौरांकडून दादरभाजीमार्केटमध्ये पाहणी केली. दादरभाजीमार्केटमध्ये सकाळच्या वेळी प्रचंड गर्दी होत असते. भाजी विक्रेते, ग्राहक आणि मोठंमोठे भाज्यांचे ट्रक दादर मार्केटमध्ये येत असतात त्यामुळे भाजीमार्केटमध्ये प्रचंड गर्दी होते. यामुळेच महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विक्रेत्यांना आणि ग्राहकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महापौरांनी रस्त्यावर उतरुन केली विना मास्क फिरणाऱ्यांना विनंती


मुंबईत कोरोना परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून महापौर स्वतः विविध ठिकाणी जाऊन मास्कबाबत जनजागृती करत आहेत. काही दिवसांपूर्वी महापौरांनी लोकल प्रवास करत जनजागृती केली होती. कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापौर जनजागृती करत आहेत. मुंबई महापौर हा मुंबईचा नागरिक आहे. जर कोरोना आटोक्यात आणायचा आहे तर मास्कबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे, तसेच हे माझे आद्य कर्तव्य आहे. परंतु कोरोनासंकट असूनही मास्कबाबत जनजागृती करणे हे खेदजनक असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी काहीदिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा लोकल प्रवास केला होता. यावेळी त्यांनी प्रवाशांना मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. तसेच जे प्रवाशी मास्कचा वापर करत नसतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही महापौर यांनी दिले होते. महापौरांनी प्रवासादरम्यान काही प्रवशांना आपल्याकडील मास्क दिले होते. तसेच रेल्वेस्थानकातील कर्मचाऱ्यांनाही मास्क वापरण्याची तंबी दिली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -