घरमुंबईशेलार, भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का? महापौरांचे भाजपावर टीकास्त्र

शेलार, भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का? महापौरांचे भाजपावर टीकास्त्र

Subscribe

“मुंबईतील पेंग्विनवरून आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणतायत… मग आता आशिष शेलारांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? भातखळकरांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांनी केली आहे. गुजरात दौऱ्यावरून परतल्यानंतर महापौरांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीकास्त्र डागले.

“मुक्या प्राणी, पक्ष्यांवरून राजकारण करुन मुंबईला बदनाम करतायतं”

- Advertisement -

“मुक्या प्राणी, पक्ष्यांवरून राजकारण करुन मुंबईला बदनाम करायचे, मुंबईला अस्थिर करतायत. मुंबईला बदनाम करतायत… महाराष्ट्राला बदनाम करतायत… सतत आरोपांवर आरोप करतायत… सिद्ध तर एकही करत नाही.” असा आरोपही महापौरांनी केला आहे.

“मी अहमदाबादला गेल्यावर सगळ्यांना उलट्या सुरु झाल्या. मी तुलना केली नव्हती, पण त्याआधीच विरोधकांना उलट्या सुरु झाल्या. मी गुपचूप नाही थेट संपर्क करुन गेले. तिथे माझे आदरातिथ्य उत्कृष्ट झाले. जिलेबी फाफडा और किशोरी बेन आपडा असं ते प्रेमाने म्हणाले.” अशी खोचकं टीकाही महापौरांनी केली आहे.

- Advertisement -

“शेलार, भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायचे का?”

मुंबई आणि गुजरामधील गुजराती बांधवांचे आभार,आम्ही देखील पाहुण्यांचे आदरातिथ्य करतो असा अनुभव आला. ज्या पक्षी, प्राण्यांवर न बोलण्याच ठरवले होते त्यावरून भातखळकर, शेलार, राणे सुपुत्र पेंग्विन वरून टीका करत आहेत.मुंबईत सर्वप्रथम 2016 मध्ये आदित्य ठाकरे यांनीच पेंग्विन आणयला सुरुवात केली. आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणतायत… मग आता आशिष शेलारांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? भातखळकरांना म्हणायचे का गुजरात पेंग्विन? ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांना चांगल म्हणूया, राजकारण कशासाठी करताय. असा शब्दात महापौरांनी खडसावले आहे.

“तुम्ही विषय काढलाच तर आज फरक दाखवते. मोदी साहेबांनी गुजरातमध्ये जे चांगले काम केले ते मुंबईप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाला दिशा दिली. 1993 मध्ये शिवसेना भाजपाबरोबर नाही, तर भाजप शिवसेनाबरोबर होती. इतिहास बदलण्याचा प्रयत्न नका करु” असंही पेडणेकर म्हणाल्या.

“चिवा ताईने, मला कांगारु उडी मारणाऱ्या असं नाव दिले. त्यांनी सांगितलंय का म्हणू नये पेंग्विनकर…. अरे बरं झाल चांगलं केलात पेंग्विनकर हे मुंबईकर झालेत हे तुम्ही सिद्ध केलात.” असा आरोपही महापौरांनी केला आहे.

“बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही तर मग वाजपेयी, अडवाणींची भाजपा कुठे राहिली”

“जर बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही तर मग वाजपेयी, अडवाणींची भाजपा तरी कुठे राहिली आहे. 264 कोटी खर्च करुन तिथं मत्स्यालय उभारुन पेंग्विन ठेवले. तिथे 6 पेंग्विन आणले पण आता 5 पेंग्विन आहेत. मग त्यांचे एक पेंग्विन कुठे गेले? इथं एक पेंग्विन संसर्गामुळे मृत्यू पावल्यावर मात्र किती गहजब केला” असंही महापौरांनी नमूद केले.

“आशिष शेलार यांनी पहिली माफी मागावी”

“गुजराती लोक महाराष्ट्रात राहून स्वत:ला मुंबईकर म्हणवतात आणि मुंबईला बदनाम करतात. गुजरातमध्ये पेंग्विन सांभाळण्यासाठीर अजूनही अनुभवी डॉक्टर नाहीत. पेंग्विनवरुन तिथे कोणताही वाद नाही. मग इथे इतका वाद कशासाठी, त्यांनी चांगले केलंय. पण त्यापेक्षा अधिक चांगले मुंबईत झाले आहे. गुजरातमध्ये सुरुवातीला 50 आणि नंतर प्रत्येक विभागासाठी 200 रुपये फी ठेवली. पण राणीची बाग पूर्ण कुटुंबाला 100 रूपयांत बघता येते. पण तिथल्या तिकीटावरून वाद नाहीत. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाना राणीची बाग फ्री आहे. परंतु तिथे नाही. जर काही समस्या आल्यास राणीबागेतल्या अधिकाऱ्यांकडून मदत मागितली जाते. प्रत्येक गोष्टीला तिथे पैसे घेते जातात. त्याला माझा आक्षेप नाही. आशिष शेलार यांनी पहिली माफी मागावी व माझ्याशी बोलावे”अशी मागणीही त्यांनी केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -