Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या प्रथम नागरिक आणि महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. छातीत दुखत असल्यामुळे किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात महापौरांवर उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, त्यांच्या तब्येतीला कोणताही धोका नसून प्रकृती स्थिर आहे. त्यांना देखरेखीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबईतील कोणतीही दुर्घटना घडली असली तरी मुंबईच्या महापौर स्वतः प्रथम जाऊन त्या घटनास्थळाची पाहणी करतात. पण आज तसे काही चित्र दिसले नाही. महापौर यांनी फक्त माध्यमांशी संवाद साधून याबाबत अधिकाऱ्यांशी बोलल्याचे सांगितले आणि त्यानंतर दुपारी महापौर किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले.

मुंबईत शनिवारी आणि रविवारी दरड आणि भिंत कोसळल्यांच्या दुर्घटना घडल्या. यामध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज या दुर्घटनेचा किशोरी पेडणेकर यांनी सविस्तर आढावा घेतला. होता आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधून घडलेल्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली होती. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ‘मुंबईत दरड कोसळून झालेली घटना ही अत्यंत दुख:द आहे. मुंबई रेकॉर्डब्रेक पाऊस होता. वसई, विरार, पालघर सगळीकडेच जलमय झाले आहे. पावसाची इशारा देत असतो. त्यावेळी अशा धोकादायक ठिकाणी घरे असणाऱ्या नागरिकांनाही घरे खाली करण्याच्या सूचना देतो. पण लोक घरं सोडणं पसंत करत नाहीत. या दुर्घटनेचा रात्रभर आढावा घेत बचाव पथक घटनास्थळी पाठवले असून नागरिकांचा बचाव केला जात आहे. पोलीस, एनडीआरएफ, पालिका, डॉक स्कॉर्ड यांसारख्या यंत्रणा आपल्या परीने काम करत आहेत. मात्र ही दुख;दायक आणि क्लेशदायक घटना आहे. हिंदमाता परिसरात पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत टाक्यांच्या कामासंदर्भात काम सुरू आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहे.’

- Advertisement -