घरमुंबईमहापौरांकडून निधी वाटपात अन्याय; भाजपचा सभात्याग

महापौरांकडून निधी वाटपात अन्याय; भाजपचा सभात्याग

Subscribe

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि नगरसेवकांनी मंगळवारी ऑनलाईन पालिका सभेत सभात्याग केला.

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पीय निधीवर सर्वपक्षीय नगरसेवकांचा समान हक्क आहे. मात्र, महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या अखत्यारीत ७५ कोटींच्या निधी वाटपात भारतीय जनता पक्षाच्या ८३ पैकी एकाही नगरसेवकाला निधी उपलब्ध केला नाही. त्यामुळे हा भाजपच्या नगरसेवकांवर केलेला अन्याय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि नगरसेवकांनी मंगळवारी ऑनलाईन पालिका सभेत सभात्याग केला.

अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याबाबत अर्थसंकल्पावेळी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना साधे बोलूही दिले नाही, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळेच भाजपने याचा जाहीर निषेध करत अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला, अशी माहिती भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली आहे.

- Advertisement -

निधीची कमतरता भासणार

महापौर किशोरी पेडणेकर यांनी निधी वाटपात भेदभाव करत भाजपच्या नगरसेवकांना डावलले आहे. त्यामुळे आता विकास कामे करताना भाजप नगरसेवकांना निधीची कमतरता भासणार आहे. महापौरांची ही कृती विकासकामांना खोडा घालणारी असून वेळ आल्यानंतर त्याला सर्वसामान्य मुंबईकर जनताच चोख प्रत्युत्तर देईल, अशी जोरदार टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -