घरताज्या घडामोडीBooster Dose: बुस्टर डोस आला तर घ्यावा लागेल - महापौर

Booster Dose: बुस्टर डोस आला तर घ्यावा लागेल – महापौर

Subscribe

लसीचा दुसरा डोस घेतला नसेल तर त्यांनी त्वरित लसीकरण पूर्ण करणे महत्त्वाचे

मुंबईतील ७० टक्के नागरिकांनी कोरोना विरोधी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. या नागरिकांना बूस्टर डोस देण्यासाठी कोविड टास्क फोर्स आणि राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस करावी अशी मागणी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबात पत्र लिहीत माहिती दिली असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. केंद्राकडून नियम आले तर नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येतील अशी माहिती माहापौरांनी दिली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, मुंबईकडे सध्या अनेक लसी आहेत. सध्या वापरात असलेल्या लसी पूर्ण होऊ देत. नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस शंभर टक्के पूर्ण झाल्यानंतर टास्क फोर्स,राज्य सरकार आणि केंद्राकडून याबाबत माहिती किंवा नियम आले तर बुस्टर डोस देण्यात येतील. बुस्टर डोस आला तर घ्यावाच लागेल असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला नसेल तर त्यांनी त्वरित लसीकरण पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. पालिका कर्मचारी घरोघरी जाऊन लसीकरणाचा आढवा घेत आहेत. मात्र तरीही ज्यांनी एकही लस घेतलेली नाही किंवा लसीकरणा संदर्भात अजूनही भिती आहे त्यांच्यात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. आपण पहिला डोस शंभर टक्के पूर्ण केला आहे आणि असे केले तरचं दुसरा डोसही शंभर टक्के पूर्ण करू आणि त्यानंतर बुस्टर डोस द्यायचा कि नाही याबाबतचा निर्णय घेऊ असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटबाबत मुंबई पालिका सज्ज झाली आहे. कर्नाटकमध्ये आढळलेल्या ऑमिक्रॉनचे रुग्ण पळाल्याने इतर राज्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेकडून अँक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.


हेही वाचा – Omicron Alert : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेची Home Quarantine नियमावली

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -