घरमुंबईमहिलांवरील अन्यायविरोधात सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येणं गरजेचं - महापौर

महिलांवरील अन्यायविरोधात सर्वपक्षीय महिलांनी एकत्र येणं गरजेचं – महापौर

Subscribe

साकीनाका घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते, त्यानंतर आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत महिलांवर होणाऱ्या अन्यायविरोधात सर्व पक्षांच्या महिलांनी एकत्र येणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

पिडीत महिला एकवर्ष थांबण्याचे कारण देखील पोलिसांनी महापौर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी असे म्हटले की, पिडीता गेल्या वर्षभरात आमदार आणि खासदारांकडे न्याय मागत होती. तसेच याप्रकणामध्ये कोणतेही राजकारण असू शकत नाही. कारण ज्या पिडीता आपल्याकडे न्याय मागण्यासाठी येतात तेव्हा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. या संदर्भातील अहवाल वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आला असल्याचे सांगत महिला म्हणून आम्ही सगळ्यांनी मग ती गरीब असो श्रीमंत असो किंवा जात-धर्माची असो जर तिच्यावर अन्याय होत असेल तर तिच्या पाठीशी आपण उभे राहिलाच पाहिजे, असेही माहापौरांनी यावेळी म्हटले आहे.

- Advertisement -

यावेळी महापौर म्हणाल्या, वस्तुस्थितीला धरुन पोलिसांनी नोंद केली आहे. फिर्यादीने सांगितलेली सर्व माहिती नोंद केली असून कोर्टात त्यांनी तपासाबाबत मागणी केली आहे. पोलिसांनी कुठेही कुचराई केलेली नाही. मुंबईचे पोलीस तप्तरतेने काम करतात. कायदा, पोलीस, सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी महत्त्वाच्या असतात.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -