Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईकरांनो दोन मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडणं टाळा, महापौरांची हात जोडून विनंती

मुंबईकरांनो दोन मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडणं टाळा, महापौरांची हात जोडून विनंती

१८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांना कोरोना लसीकरण नोंदणी केल्यानंतर तसेच मेसेज आल्यानंतर करोना लस दिली जाणार

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी मृत्यूदरामुळे चिंता व्यक्त होत आहे. मुंबईतही कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईसह राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. परंतु मुंबईत अनेक विभागातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहाव, विनाकारण फिरु नये तसेच डबल मास्क वापरावा असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगण्यासाठी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी नेहमीच रस्त्यावर उतरुन लोकांना आवाहन केले आहे. तसेच पुन्हा त्यांनी मुंबईकरांना मास्क घालण्याचा आणि विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पेडणकेरांनी म्हटले आहे की, मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करते की, मास्क वापरा, दोन मास्क वापरा, कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर जाणं टाळावे. असे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यात १ मे म्हणजेच आजपासून १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. यासंदर्भात पेडणेकरांनी म्हटले आहे की, ४६ वर्षांपुढील नागरिक जे दुसऱ्या लसीच्या डोससाठी येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल तसेच १८ ते ४४ वर्षांमधील नागरिकांना कोरोना लसीकरण नोंदणी केल्यानंतर तसेच मेसेज आल्यानंतर करोना लस दिली जाणार आहे. त्यामुळे ज्यांना मेसेज आला नाही अशा नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये. जशी लसीचा साठा उपलब्ध होत जाईल तसे लसीकरण करण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी केल्यावर ज्यांना मेसेज आला आहे त्यांनीच कोरोना लसीकरण केंद्रावर जायचे आहे. ज्या नागरिकांना अजून मेसेज आला नाही त्यांनी कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊ नये.

- Advertisement -