घरमुंबईवॉर रुममधून मुंबईकरांना बेड्स उपलब्ध करुन देणार- महापौर

वॉर रुममधून मुंबईकरांना बेड्स उपलब्ध करुन देणार- महापौर

Subscribe

मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज बॉम्बे हॉस्पीटलला भेट दिली. यावेळी वॉर रुममधून मुंबईकरांना बेड्स उपलब्ध करुन देणार अशी आश्वासन महापौरांनी दिले.  यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, रुग्णालय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बॉम्बे हॉस्पीटलला सध्या २०० बेड आवश्यकता आहे. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत १५० बेड रुग्णालयाला दिले जाणार आहेत. १० बेड राखीव ठेवले जाणार आहे. तेही अशा रुग्णांना ज्यांना या रुग्णालयावर विश्वास असतो म्हणून उपचारासाठी भर्ती व्हायचे असते. मात्र १० वर एकही बेड आधीच राखीव ठेवले जाणार नाहीत. दरम्यान महौपांनी आज रुग्णालयांमधील रेमिडेसिवीर इंजेक्शन साठ्याची देखील पाहणी केली.

यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, ”सरकार कोरोना रुग्णांच्या बाबतीत कोणतही हलगर्जीपणा करत नाही परंतु नागरिकांना साथ देणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता महापालिकेशी संपर्क करा. खाजगी रुग्णालयांमध्ये बेड आरक्षित करु नका, तसेच रुग्णांनी देखील पैसे आहेत म्हणून रुग्णालयात येऊन पडू नका. पालिका अशा पद्धतीने बेड आरक्षित केलेल्या रुग्णालयांवर कारवाई करत आहे. पालिका वॉर्डमधून येणाऱ्या रुग्णांना प्राधान्य दिले जाणार असून , थेट रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर अडकाव केला जाणार आगे. येणारा आठवडा सुटट्यांचा आठवडा असल्याने मुख्य़मंत्री योग्य तो निर्णय घेतील त्यामुळे संध्याकाळ पर्यत वाट बघू या. असे लॉकडाऊन वाढवण्याचे सुचक संकेत महापौरांनी दिले.

- Advertisement -

आघाडी सरकारला बदनाम करायचे काम विरोधक करतायत

लसीकरणावरून कोण टीका करतयं याकडे बघायला वेळ नाही आणि आम्ही बघणार पण नाही. जितक्या टीका करायचात त्या करत रहा, जे मुंबईकरांसाठी करायचे ते आम्ही करणार आहे. ऑफिसमध्ये बसायचे आणि टीका करायचा, या ना आमच्यासोबत कोव्हिड वॉर्डमध्ये,.. या ना आमच्यासोबत आयसीयू वॉर्डमध्ये. कुठेतरी आघाडी सरकारला बदनाम करायचे, उद्धवजींच्या कामावर टीका करायचे काम करतात. लसीकरणावरून गळे काढणाऱ्यांना लसीच्य़ा साठ्याबद्दल विचारा. चक्क आता सांगतात लसीकरणावरून खोटे बोललो. हॉस्पीटलमधील लसीचा शुन्य आकडा, ज्या ठिकाणी एक दिवस पुरेल एवढा साठा आहे ते कसे खोट होऊ शकते? मुंबईकरांना हात जोडून विनंती गळे काढणाऱ्यांवर विश्वास ठेऊ नका, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रयत्न करा.

५० हजार लसीकरण दिवसाला होते. त्यामुळे जसे पानावर बसल्यावर लोणचं देतात, तसा जर लसीचा साठा दिला जात असेल तर ते महाराष्ट्राच आणि आपल्या मुंबईचं दुर्देव आहे. केंद्र जर पुण्याला थेट लस पुरवत असेल तर हा सरळसरळ महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेवर अन्याय आहे. पुणे पण आमच्या महाराष्ट्राचे आहे, त्यामुळे पुण्याला दिले याचे वाईट नाही. पण पुणे भाजपाचे आहे म्हणुन जर असे होत असेल तर ते कुंपणच शेत खातयं असे म्हणायचे का? पंतप्रधान कसा दुजाभाव करत असतील असे मला वाटत नाही. त्यामुळे थेट लस राज्य सरकार, महापालिका, केंद्राच्या माध्यमातून मिळते बाहेर कुठे मिळत नाही. असे महापौर म्हणाल्या

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -