घरCORONA UPDATEMumbai Coronavirus : इतर राज्यांप्रमाणे मुंबईत घाईत निर्णय घेणार नाही; महापौर पेडणेकरांचा...

Mumbai Coronavirus : इतर राज्यांप्रमाणे मुंबईत घाईत निर्णय घेणार नाही; महापौर पेडणेकरांचा सावध पवित्रा

Subscribe

इतर राज्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी घाईघाईने निर्णय घेतले. या निर्णयामुळे त्यांना पाच- पाच वेळा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. असंही महापौर म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. यात ओमिक्रॉनच्या एन्ट्रीमुळे मुंबईकरांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. यामुळे मुंबईतही कोरोनासंबंधीत नियम आता अधिक कडक केले जात आहेत. मात्र इतर राज्यांप्रमाणे मुंबईत घाई घाईने निर्णय घेणार नाही अशी माहिती मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईतील झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “लगेच कुठेही निर्णय घेता येणार नाही, कारण इतर राज्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी घाईघाईने निर्णय घेतले. या निर्णयामुळे त्यांना पाच- पाच वेळा लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. आपण एकचं निर्णय घेत एकच लॉकडाऊन लावला. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट मोठ्याप्रमाणात येईल असे वाटले होते ती आली सुद्धा मात्र पंधरा दिवसाच्या आत तिलाही रोखता आले, कारण त्यावेळी आपण लॉकडाऊनमध्येचं होतो. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला बऱ्यापैकी रोख लावता आला. तोपर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागला. मात्र लोक यासंदर्भातील नियमावली फॉलो करत आहेत. असंही महापौर म्हणाल्या.

- Advertisement -

“कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकं कोरोनाच्या सौम्य लक्षणांनी बाधित झाले. तसेच ज्यांनी अजिबात लस घेतली नाहीत ते अति जोखमीचे जास्त लक्षणं असलेले रुग्ण म्हणून रुग्णालयात भरती झालेत. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकरं लसीकरण पूर्ण करा, तसेच दोन डोस घेऊन 35 -36 आठवडे पूर्ण झालेत त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्राशी संपर्क करत आपली तारखी दाखवून कुठल्या पिरियडमध्ये लस घ्यावी याची माहिती घेण्यास हरकत नाही.  बुस्टर डोस लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात फ्रंट वर्कर आले आहेत.” असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

“अनेक तज्ज्ञ डॉक्टर आपआपल्या परीने उपाय सुचवत आहे. मात्र राज्याची टीम आहे महापालिकेची टीम आहे. ज्यांनी ज्यांनी कोणी उपाय सांगितले आहेत ते लक्षात घेता. त्य़ावर मंत्री महोदय महापालिकाचे आयुक्त उपायुक्त यांच्याशी चर्चा केली जाते. या चर्चेअंती येणारी नियमावली मुंबईत फॉलो करायची आहे. मुंबईकर नियमावली पाळतायत. काही खासगी टेस्ट किटने टेस्ट करत आहेत. तर काही टेस्टचं करायला नकार देत आहे. क्वारंटाईनला घाबरत अनेकजन टेस्टला नकार दिला जात आहे.” असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.

- Advertisement -

लता मंगेशकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती चांगली आहे. सौम्य लक्षणं असून त्यांना ऑक्सिजनची गरज लागणार नाही. त्या होम क्वारंटाईन होतील किंवा मुंबईतील ब्रीच काँडी रुग्णालयासारख्या चांगल्या रुग्णालयात उपचार घेतील. असंही महापौर किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.


Heart Transplant from Pig : ऐतिहासिक! डुकराच्या ह्रदयावर आता जगणार माणूस, अमेरिकेत यशस्वी शस्त्रक्रिया

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -