Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बापरे! कूपर रुग्णालयातील ज्वालाग्राही सॅनिटायझरच्या साठ्याच्या ठिकाणी महापौरांची बैठक

बापरे! कूपर रुग्णालयातील ज्वालाग्राही सॅनिटायझरच्या साठ्याच्या ठिकाणी महापौरांची बैठक

रुग्णालय व्यवस्थापनाचा अक्षम्य हलगर्जीपणा

Related Story

- Advertisement -

मुंबईत सध्या आगीच्या दुर्घटना सातत्याने घडत आहेत. आजच सकाळी वर्सोवा येथे एलपीजी गॅस सिलिंडरच्या साठा असलेले गोदाम भीषण आगीत आणि सिलिंडरच्या स्फोटात जळून खाक झाले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तेथून त्यांनी कूपर रुग्णालयात जखमींची भेट घेतली आणि विचारपूस केली.

वास्तविक, महापौरांनी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर, कूपर आणि भगवती रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, याची पाहणी करण्याचे ठरवले होते. मात्र ही दुर्घटना घडल्याने प्रथम वर्सोवा येथे गेल्या होत्या. नंतर त्या कूपर येथे गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत एक बैठक घेतली. मात्र ही बैठक ज्या सभागृहात घेण्यात आली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही सॅनिटायझरने भरलेले अंदाजे दहा लिटरचे प्लॅस्टिकचे जवळजवळ ३० पेक्षाही जास्त कॅन भरून ठेवल्याची गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

जर या सभागृहातील सॅनिटायझरच्या साठ्याचा दुर्दैवाने शॉर्टसर्किट, आगीची ठिणगी यांच्याशी संपर्क झाला असता तर किती मोठी दुर्घटना घडली असती? त्यामध्ये, किती मोठी जीवितहानी झाली असती? मग अशा दुर्घटनांना कोणाला जबाबदार धरले असते? अशा प्रश्नांनी डोकेवर काढले आहे.

तसेच रुग्णालयात आवश्यक सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी ज्या काही सॅनिटायझरच्या साठ्याची आवश्यकता असते, तर तो साठा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्थाही असली पाहिजे. मात्र कूपर रुग्णालयात सॅनिटायझरचा किमान ३०० लीटर पेक्षाही जास्तीचा मोठा साठा सभागृहाच्या ठिकाणी ठेवणे कितपत योग्य आहे? बरं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जर कूपर रुग्णालयात भेट देण्याचे ठरवले होते, तसे नियोजन केले होते तर मग रुग्णालय व्यवस्थापनाने त्यांची बैठक ज्या सभागृहात घेतली त्या ठिकाणचा ज्वालाग्राही सॅनिटायझरचा साठा अन्यत्र ठिकाणी अथवा सुरक्षित ठिकाणी का हलवला नाही? बैठक होईपर्यंत जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांना या गंभीर बाबीची जाणीव त्याचवेळी का झाली नाही? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

मुंबईतील १२५ रुग्णालयांकडून अग्नी सुरक्षा नियम धाब्यावर 

- Advertisement -

भंडारा येथील सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राज्यातील आणि मुंबईतील यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील १३०० पेक्षा जास्त सरकारी, खासगी रुग्णालये, प्रसूती गृहे, दवाखाने यांचे फायर ऑडिट केले जात आहे. त्यात सुमारे १२५ रुग्णालयांनी अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. याच अनुषंगाने मुंबईच्या महापौरांनी पालिकेच्या कूपर, भगवती आणि ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या ठिकाणी आज भेट देण्याचे नियोजन केले होते. मात्र कूपर रुग्णालयातच अगदी महापौरांच्या बैठकीप्रसंगी सॅनिटायझरचा साठा चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. वास्तविक, सॅनिटायझरचा साठा रुग्णालयातील स्टोअर रूममध्ये अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवणे अपेक्षित होते.


हेही वाचा –  वर्सोवा गॅस सिलिंडर स्फोटप्रकरणी महापौरांचे चौकशीचे आदेश


 

- Advertisement -