Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईकरांनी कोरोना नियमांचे केले पालन, महापौरांनी मानले आभार

मुंबईकरांनी कोरोना नियमांचे केले पालन, महापौरांनी मानले आभार

मुंबई महापौर किशोरी पेडणेकरांकडून मुंबईकरांना ९५ टक्के मार्क

Related Story

- Advertisement -

मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईची वाटचाल आता पुन्हा लॉकडाऊनकडे होत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून २५ हजारानं कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे मुंबईकरांनी चांगले पालन केले असल्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. कोरोना नियमांचे पालन केल्यामुळे मुंबईकरांना ९५ टक्के मार्क दिले आहेत. महापौर पेडणेकरांनी मुंबईतील दादर,गिरगाव, वरळीतील भागांची पाहणी केली आहे.

मुंबईत मोठ्या उत्साहात धुलिवंदन करण्यात येतो परंतु वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव आणि प्रशासनाने घातलेल्या बंदीचे मुंबईकरांनी पालन केले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईची पाहणी करताना म्हटले आहे की, मी मुंबईतील नागरिकांना ९५ टक्के मार्क देईल. कारण मुंबईतील ९५ टक्के लोकं ऐकतात त्यामुळे ९५ टक्के मार्क देणार उर्वरित ५ टक्के लोक नियमांचे पालन करत नाही आहेत. मी त्यांना विनंती करेन की, विनाकारण बाहेर पडू नका. कोरोनामुळे पुन्हा भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियमांचे पालन करा हिच विनंती असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी रविवारपासून रात्रीची संचार बंदी जाहिर केली आहे. मुंबईसह राज्यात रात्रीची संचार बंदी असणार आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. मिशन बिगीनच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने नवी नियमावली जाहिर केली आहे. त्याचप्रमाणे होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावरही कडक निर्बंध लागू केले आहे.

- Advertisement -