घरताज्या घडामोडीशिवसेना-आयुक्तांमध्ये खडाजंगी; इक्बालसिंह चहल यांना परत पाठवण्याची मागणी

शिवसेना-आयुक्तांमध्ये खडाजंगी; इक्बालसिंह चहल यांना परत पाठवण्याची मागणी

Subscribe

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना-आयुक्तांमध्ये खडाजंगी झाली आहे. महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उद्धटपणे उत्तरे दिल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा. जर तसं जमत नसेल तर राज्य शासनात परत जावं. शिवाय, याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक आज प्रभाग समित्यांची निवडणूक असल्याने सकाळी सभागृहात पोहोचल्या. मात्र, पालिकेतील अधिकारी अनुपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या जी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने उपायुक्त तसेच विभागीय सहायक आयुक्त उपस्थित न राहिल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांसह महापौर किशोरी पेडणेकर यांनी सभागृहाबाहेर ठिय्या मारला. या निवडणुकीची पूर्ण कल्पना असतानाही या परिमंडळ दोनचे उपायुक्त न आल्याने त्यांच्या निषेध करण्यासाठी विभागातील सेनेच्या नगरसेवकांसह महापौर ही आंदोलनात सहभागी झाल्या असल्या तरी केवळ सहाय्यक आयुक्तांना धडा शिकवण्यासाठीच सेनेच्या नगरसेवकांनी हा स्टंट केल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांना बुधवारपासून सुरुवात झाली. सकाळी दहा वाजता जी/ दक्षिण प्रभाग समितीची निवडणूक पार पडली. या प्रभागात एकमेव शिवसेनेचा अर्ज प्राप्त झाल्याने नगरसेवक दत्ता नरवणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. परंतु निवडणुकीची औपचारिकता पार पाडण्यासाठी या प्रक्रियेला सुरुवात झाली तरी प्रशासनाच्यावतीने उपायुक्त व संबंधित सहाय्यक आयुक्त उपस्थित राहिले नाही. त्यामुळे सेनेच्या नगरसेवकांसह महापौरांनी याचा ठिय्या मारत निषेध नोंदवला. त्यानंतर अखेर पिठासीन अधिकारी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या अधिकाऱ्यांअभावी निवडणुकीला सुरुवात केली आणि सर्व दरवाजे लावून घेतले. त्यावेळी जी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे हे पाहोचले. पण ते पिठासीन अधिकाऱ्यांच्या शेजारी न बसता सदस्यांसह बसले.

त्यामुळे पहिली निवडणूक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थिती शिवाय पार पडल्यानंतर जी/ उत्तर विभागाच्या निवडणुकीत प्रशासनाच्यावतीने उपायुक्त देविदास क्षिरसागर हे उपस्थित राहिले. जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे हे केवळ आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे ऐकत असून सेनेच्या नगरसेवकांसह महापौरांचेही ऐकत नाही. त्यामुळे उघडे यांच्या विरोधात आंदोलन करण्याची नामी संधी सेनेच्या नगरसेवकांना मिळाली. त्यामुळेच आंदोलनाचा स्टंट सेनेच्या नगरसेवकांनी केल्याचे बोलले जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -