घरमुंबईमेट्रो ३ कारशेडच्या खोदकामाचा भाग कोसळला; १ मृत्यू तर १ गंभीर जखमी

मेट्रो ३ कारशेडच्या खोदकामाचा भाग कोसळला; १ मृत्यू तर १ गंभीर जखमी

Subscribe

मेट्रो ३ कारशेडच्या कामादरम्यान एका कामगाराचा मृत्यु झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सात टप्प्यात सुरू आहे. पवई येथे मेट्रो ३ चे काम सुरू असून यादरम्यान शुक्रवारी अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसरा कामगार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भुयारीकरणाच्या कामादरम्यान जमिन धसल्याने घडली आहे असं समोर आलं आहे. या घटनेनंतर त्वरित त्या ठिकाणाहून कामगारांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मेट्रो प्रशासनाकडून संबंधित कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

- Advertisement -

नक्की काय घडलं?

पवई येथे मेट्रो ३ चे काम सुरू होते. बोगद्याच्या बाजूला जो सुरक्षित भाग असतो, जिथे आपत्कालीन परिस्थितीत मेट्रो मध्ये बिघाड झाला तर पादचारी उतरून चालू शकतात, त्या ठिकाणी मनुष्यबळ वापरून खोदकाम सुरू असताना अचानक काही भाग कोसळला. त्यात एका कामगारचा मृत्यू झाला असून एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -