घरताज्या घडामोडीmumbai metro : ...तर ५ लाखांची आर्थिक मदत; मेट्रो-७, मेट्रो-२ए प्रवाशांना विमा...

mumbai metro : …तर ५ लाखांची आर्थिक मदत; मेट्रो-७, मेट्रो-२ए प्रवाशांना विमा संरक्षण

Subscribe

मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रोने एक पाऊल पुढे टाकल्याचे पाहायला मिळते आहे. कारण मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMMOCL) सर्व प्रवाशांना सरकारकडून एक गिफ्ट देण्यात आले आहे.

मुंबई मेट्रोने (Mumbai Metro) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई मेट्रोने एक पाऊल पुढे टाकल्याचे पाहायला मिळते आहे. कारण मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMMOCL) सर्व प्रवाशांना सरकारकडून एक गिफ्ट देण्यात आले आहे. सरकारने जाहीर केल्यानुसार आता सर्व प्रवाशांना ग्रुप विम्याचा लाभ घेता येणार आहे. (mumbai metro accident insurance cover up to rs 5 lakh for passengers metro 2a and metro 7)

मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोने प्रवास करताना अपघात झाला किंवा रुग्णालयात दाखल व्हावे लागले तर उपचारासाठी १ लाख रुपये आणि ओपोडीसाठी १० हजार रुपये दिले जातील. तसेच, अपघाती मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये आणि अपंगत्व आल्यास ४ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

‘असा’ घ्या या योजनेचा फायदा

मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (MMMOCL) या खास विमा संरक्षणाचा लाभ मेट्रो-७ आणि मेट्रो-२ए वर वैध तिकीट, मासिक पास, स्मार्ट कार्ड किंवा QR कोड तिकीट असलेल्या प्रवाशांना घेता येणार आहे. मेट्रो स्टेशनची इमारत, प्लॅटफॉर्म, ट्रेन, स्टेशन परिसरामध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांना या विम्याचा लाभ घेता येणार आहे. मात्र, पार्किंग परिसराच्या बाहेरच्या भागामध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास प्रवाशांना विम्याच्या लाभ घेता येणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – मेट्रो -३ मार्ग यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार; मुख्यमंत्री शिंदे यांच्यांकडून प्रकल्पाची पाहणी

कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही

मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, या खास विमा संरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले जाणार नाहीत. गेल्या वर्षी मेट्रो-७ आणि मेट्रो-२ ए च्या ३५ किमी मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या मार्गांवर दिवसभरात दररोज २५३ फेरी चालवल्याता जातात, ज्यामध्ये १.५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

मेट्रो-७, मेट्रो-२ए प्रवाशांसाठी विमा संरक्षण

  • रुग्णालयात दाखल झाल्यावर १ लाख रु.
  • ओपीडीसाठी १० हजार रु.
  • मृत्यू झाल्यास ५ लाख रु.
  • अपंगत्व आल्यास ४ लाख रु.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -