घरताज्या घडामोडीMumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रोत तांत्रिक बिघाड, स्थानकावर प्रवाशांची गर्दी

Mumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रोत तांत्रिक बिघाड, स्थानकावर प्रवाशांची गर्दी

Subscribe

घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली होती. असल्फा मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती.

घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली होती. असल्फा मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, मेट्रो प्रशासनाने बिघाड दुरुस्त केल्याचा दावा केला आहे. (mumbai metro ghatkopar versova metro line disturbed due to technical fault at asalpha station vvp96)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घाटकोपर-मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली होती. असल्फा मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही मार्गावरील मेट्रो वाहतूक थांबवण्यात आली. परिणामी प्रवाशांना नजीकच्या स्थानकात उतरवण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

- Advertisement -

मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बिघाडामुळे मनस्ताप सहन करावा लागला. पर्यायी वाहतूक म्हणून बेस्ट बस, रिक्षाचा पर्याय वापरावा लागला. त्याच्या परिणामी बसमधील गर्दी आणखीच वाढली. तर, रिक्षा मिळवण्यासही अडचणी निर्माण झाल्या.

दरम्यान, मेट्रो प्रशासनानेही ट्विटरवरून या बिघाडाबाबत माहिती दिली आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत केली असल्याचा दावा केला. या बिघाडामुळे मेट्रोच्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘…त्याचे परिणाम महाराष्ट्रभर भोगावे लागतील’, ‘बारसू’वरून आव्हाडांचा सरकारला इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -