घरमुंबईMumbai Metro: डिसेंबरमध्ये मेट्रो 3 चा पहिला टप्पा होणार खुला; आरे ते...

Mumbai Metro: डिसेंबरमध्ये मेट्रो 3 चा पहिला टप्पा होणार खुला; आरे ते बीकेसी, 85 टक्के काम पूर्ण

Subscribe

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MSRC) ने आरे येथे कारशेडचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारशेडचे बांधकाम अंदाजे 53.8 टक्के पूर्ण झाले आहे. मेट्रो सेवा निर्धारित वेळेत सुरू करण्यासाठी, MMRC ने पहिल्या टप्प्यात मेट्रो मार्ग आणि स्टेशनच्या कामासह सुमारे 85.2 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.

मुंबई: मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (MSRC) ने आरे येथे कारशेडचे बांधकाम वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारशेडचे बांधकाम अंदाजे 53.8 टक्के पूर्ण झाले आहे. मेट्रो सेवा निर्धारित वेळेत सुरू करण्यासाठी, MMRC ने पहिल्या टप्प्यात मेट्रो मार्ग आणि स्टेशनच्या कामासह सुमारे 85.2 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. या कारशेडमध्ये ट्रॅक टाकणे, उपकरणे बसवणे यासह अनेक आवश्यक व्यवस्था करण्यात प्रशासन व्यस्त आहे. राज्य सरकारने डिसेंबर 2023 पासून आरे ते BKC दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. (Mumbai Metro Phase 1 of Metro 3 to open in December Aarey to BKC 85 percent work complete)

सरकार बदलल्याने कारशेडच्या कामाला वेग

कारशेडच्या बांधकामावर बंदी असल्याने गेल्या अडीच वर्षांपासून आरेतील बांधकामे ठप्प झाली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर 2022 पासून कारशेडचे काम पुन्हा सुरू झाले आहे. मेट्रो 3 चं काम दोन टप्प्यांच केलं जात आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी आणि दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते कफ परेडदरम्यान करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे काम 90 टक्क्यांहून अधिक, तर दुसऱ्या टप्प्यातील काम 80 टक्क्यांहून अधिक पूर्ण झालं आहे. या प्रकल्पासाठी 23 हजार 136 कोटी खर्च होणार आहे.

- Advertisement -

25 हेक्टरमध्ये कारशेड बांधण्यात येतय

मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या गाड्यांच्या देखभालीसाठी आरेमध्ये 25 हेक्टर जागेवर कारशेड बांधण्यात येत आहे. या कारशेडमध्ये 42 मेट्रो ट्रेन सहज ठेवता येतात. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत आंध्र प्रदेशमध्ये मेट्रो-3 चे रेक तयार केले जात आहेत.

80 टक्के मेट्रो तयार

कफ परेड आणि सीप्झ दरम्यान मेट्रो-3 कॉरिडॉरचे बांधकामही प्रगतीपथावर आहे. या संपूर्ण मार्गाचे 79.8 टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात 85.2 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 76 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. SEEPZ ते BKC ही मेट्रो लवकरच सुरू होईल, तर जून 2024 पासून संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

जून 2024 पासून संपूर्ण मार्गावर मेट्रो धावणार. डिसेंबर 2023 पासून पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार

  • बोगद्याचे काम – 100%
  • स्टेशन सिव्हिल वर्क – 88.7%
  • नागरी काम – 91.3%
  • एकूण प्रणाली कार्य – 47.5%
  • ट्रॅक- 55.6%

(हेही वाचा: MLA Disqualification Case : दोन्ही गटांच्या वकिलांमध्ये खडाजंगी; नार्वेकर वैयक्तिक टिप्पणीवर नाराज )

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -