घरट्रेंडिंग२ रूपयांमध्ये मुंबईत कुठेही पोहचा

२ रूपयांमध्ये मुंबईत कुठेही पोहचा

Subscribe

मेट्रोने दिला मुंबईकरांसाठी स्वच्छ पर्याय

मुंबईतल्या वाहतूक कोंडीच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी मेट्रोसारखा जलद पर्याय पुढे आला. आता मेट्रोपासून सायकल नेण्याचा पर्याय पुढे आला आहे. तासाला दोन रूपये इतक्या अल्प दरात हा पर्याय उपलब्ध असणार आहे. आज घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गावर जागृती स्टेशनवर सायकलचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर ए राजीव यांच्या हस्ते या सुविधेची सुरूवात करण्यात आली आहे.

mumbai metro
मुंबई मेट्रोचा अवघ्या २ रूपये प्रति किलोमीटर असा प्रवासाचा पर्याय 

या सायकलला जीपीएस लावण्यात आले आहे. MyByk या एप्लिकेशनच्या माध्यमातून मेट्रोच्या प्रवाशांना या सायकलचा वापर करता येणार आहे. जीपीआरएसच्या माध्यमातून या सायकल हा प्रवाशांना मार्ग दाखवण्यासाठीही मदत करतील. ” मुंबईकर प्रवाशांसाठी नेहमीच मेट्रो वन सेनेने विविध चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सायकल देण्याचा पर्याय म्हणजे गो ग्रीनसाठीचा पुढाकार असल्याचे मुंबई मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय कुमार मिश्रा यांनी सांगितले. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच वाहतुकीचा हरित पर्याय मुंबईकर नक्कीच अवलंबतील असेही ते म्हणाले. मेट्रोने आपल्या कॉलेज, ऑफिस तसेच घराकडे जाण्यासाठी प्रवास करणारे मुंबईकर सायकलच्या सेवेचा लाभ घेतील असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -