घरमुंबईमेट्रोने ६३०३ झाडे तोडली, लावली किती?

मेट्रोने ६३०३ झाडे तोडली, लावली किती?

Subscribe

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मेट्रोसाठी तब्बल ६ हजार ३०३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे

मुंबईत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. मेट्रोसाठी तब्बल ६ हजार ३०३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रकल्पाला डोळे झाकून झाडे तोडण्याची परवानगी दिली जात आहे. मेट्रोने किती झाडांचे पुनर्रोपण केले, किती झाडे नव्याने लावली याचा हिशोब द्यावा ,अशी मागणी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आली.

मुंबईत मेट्रोच्या ७ प्रकल्पाचे काम सुरु आहे. मेट्रोसाठी कारशेड बांधले जाणार आहे. तसेच इतरही कामे सुरू असल्याने या कामासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने मेट्रोने २,८०१ झाडे तोडण्याची मंजुरी घेतली होती. मेट्रोच्या कामादरम्यान १५ स्थानकाच्या उभारणीसाठी २१४, गोरेगांव आरे कॉलनी येथील इलेक्ट्रिक टॉवरसाठी १३७, आरे कारशेडसाठी ३०७, यार्डसाठी ५४ अशी मंजुरी घेतलेली २८०१ झाडे तोडण्यात आली.

- Advertisement -

मंजुरीनंतरही अतिरिक्त ३,४२६, मुंबई सेंट्रल येथील ७६ अशी एकूण ६,३०३ झाडे तोडण्यात आली आहेत. ‘मेट्रो’कडून वेळोवेळी कामासाठी झाडे तोडण्याची निकड व्यक्त करून मंजुरी मिळवण्यात येते. त्यामुळे अशी अतिरिक्त झाडे तोडल्याचा आकडा तब्बल ३,५०३ वर गेला आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी मेट्रोसाठी आणखी १५ झाडे तोडण्यासाठी आलेला प्रस्ताव बहुमताने फेटाळून लावण्यात आला.

 

मुंबईच्या दीड कोटी लोकसंख्येचा विचार करता मुंबईत असलेल्या २९ लाख ७५ हजार २२८ झाडांनुसार पाच माणसांमागे फक्त एक झाड आहे. कॅनडामध्ये हेच प्रमाण प्रतिव्यक्ती ८ हजार ९५३ झाडे, ब्राझिलमध्ये १ हजार २९३, चीनमध्ये १ हजार १०२ असे प्रमाण आहे. सरकारच्या वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत मुंबईत प्रतिवर्षी सहा हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र यामध्ये लावलेली झाडे जगतात काय ? ‘वन’ धोरणानुसार लोकवस्तीच्या ३५ टक्के भाग हा झाडांनी व्यापलेला असावा. मात्र मुंबईतील हे प्रमाण केवळ २० टक्के आहे.
– यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -