घरताज्या घडामोडीखुशखबर! मेट्रो ३ साठी ५६३७ कामगारांची भरती; राज्यातील तरूणांना प्राधान्य

खुशखबर! मेट्रो ३ साठी ५६३७ कामगारांची भरती; राज्यातील तरूणांना प्राधान्य

Subscribe

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला अधिकृत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यामध्ये ५ हजार ६३७ कुशल आणि अकुशल कामगार पदासाठी भरती काढण्यात आली आहे.

कोव्हिड १९ च्या मुंबईतील उद्रेकानंतर बहुतांश स्थलांतरीत मजुरांनी मुंबई सोडली. याचा फटका हा मुंबईसह महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पाला बसला आहे. कुलाबा वांद्रे सिप्झ दरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रो ३ प्रकल्पालाही मजुरांचा तुटवडा सध्या भासत आहे. त्यामुळेच प्रकल्पातील महत्वाच्या टप्प्यातील कामे करण्यासाठी आता कुशल आणि अकुशल अशा दोन्ही प्रकारच्या कामगारांची भरती करण्यासाठी मेट्रो ३ मार्फत सुरूवात झाली आहे.

मेट्रो ३ मार्गावर भुयारी स्थानके, एनएटीएम व बोगद्यामध्ये कुशल आणि अकुशल कामगारांचा तुटवडा भरून काढण्यासाठी आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुढाकार घेतला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगार भरती करण्याचा निर्णय मेट्रो ३ प्रशासनामार्फत घेण्यात आला आहे. गवंडी, सुतार काम, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, अकुशल कामगार, रिगर, पाईप फिटर, क्रेन ऑपरेटर अशा पदांसाठी ही भरती प्रक्रिया मेट्रोमार्फत सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

या कामांमध्ये स्लॅब, कॉलम, कॉंक्रिटच्या भिंती, जिने आदी कॉंक्रिटीकरण करणे तसेच इलेक्ट्रिशयन आणि वायरिंगची, वेल्डिंगची कामे अशा कामांचा समावेश आहे. अकुशल कामगारांचीही मेट्रो ३ च्या कामात गरज भासणार आहे. एकूण ५ हजार ६३७ कामगारांची भरती करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक फिटर २ हजार ३८ तर अकुशल कामगार १ हजार ८७७ इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज या मेट्रोच्या कामासाठी भासणार आहे. सुतार काम करणारे ८०४ तर रिगर म्हणून काम करणारे ३१२ कामगार सध्या एमएमआरसीला हवे आहेत.


हेही वाचा – वन्यजीव तस्करी प्रकरणी सर्वच संशयितांचा जामीन फेटाळला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -