Mumbai Metro : मुंबई मेट्रोने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाचा प्रवास आणखी सुलभ होणार आहे. कारण येत्या काही दिवसात मुंबईत मेट्रोचे नवीन स्थानकं सुरू होणार आहेत. याशिवाय मेट्रो स्थानकांवरून इच्छितस्थळी जाण्यासाठी किंवा मेट्रो स्थानकांपर्यंत पोहचण्यासाठी येणारे अडथळे दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणाने (MMRTA) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Mumbai Metro Traveling by metro Important decision of MMRTA 28 stations fixed)
‘एमएमआरटीए’ने मुंबई उपनगरातील 28 मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा आणि शेअरिंग टॅक्सी स्टँड उभारण्यास परवानगी दिली आहे. सुरुवातीला सहा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर या 28 मेट्रो स्थानकांवर शेअरिंग रिक्षा आणि टॅक्सी सेवा सुरु करण्यात येईल. प्रवास सुलभ होणार असल्यामुळे नोकरदार वर्ग मेट्रो प्रवासाला अधिक प्राधान्य देईल. प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या या सेवेवर एमएमआरटीएकडून देखरेख ठेवण्यात येईल. या स्थानकांवर शेअरिंग रिक्षा आणि टॅक्सी चालकांची या 28 मेट्रो स्थानकांवर झुंबड उडाल्यास परिसरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. हाच विचार करून एमएमआरटीएने पुढील सहा महिने हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचे ठरवले आहे.
हेही वाचा – अटींची पूर्तता न करणाऱ्या 500 गणेश मंडळांचे परवानगी अर्ज बाद; वाहतूक अडथळ्यांचे कारण
‘एमएमआरटीए’च्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय कितपत व्यवहार्य ठरु शकतो, हे आम्ही आधी तपासून पाहू. त्यानंतर संबंधित परिसरात शेअरिंग रिक्षा, टॅक्सीमुळे वाहतुकीची समस्या उद्भवणार नसेल तर आम्ही मेट्रो स्थानकांच्या परिसरात रिक्षा आणि टॅक्सी स्टँड सुरु करण्याची परवानगी देऊ.
‘एमएमआरटीए’कडून 40 पेक्षा अधिक शेअर रिक्षा-टॅक्सी मार्गांची यादी प्रसिद्ध केली जाईल. बोरिवली आरटीओ मेट्रो लाईन 2A (अंधेरी पश्चिम ते दहिसर) आणि मेट्रो लाईन 7 (गुंदवली ते दहिसर) वरील 20 स्थानकांवर टॅक्सी स्टॅंड असणार आहे. दरम्यान, अंधेरी आरटीओ मेट्रो लाईन 1 (वर्सोवा ते घाटकोपर) आणि मेट्रो लाईन 2A (अंधेरी पश्चिम ते दहिसर) वरील 8 स्थानकांबाहेर ही सेवा असणार आहे.
हेही वाचा – मुलीला वडिलांशी भेटू दिले नाही तर फ्लॅटच्या मालकी हक्क…; मुंबई उच्च न्यायालयाची महिलेला तंबी
या मेट्रो स्थानकांबाहेर शेअरिंग रिक्षा-टॅक्सी स्टँड सुरु होणार
आरे, वर्सोवा, डहाणूकरवाडी, डीएन नगर, अंधेरी, गोरेगाव, दिंडोशी, आकुर्ली, मंडपेश्वर, मागाठाणे, ओवारीपाडा, देवीपाडा, आनंद नगर, कांदारपाडा, चकाला, मालाड (पश्चिम), कांदिवली, नॅशनल पार्क, एकसर, दहिसर पूर्व, पोईसर बोरिवली आणि शिंपोली या स्थानकांचा समावेश आहे.