घरमुंबईहिंदुत्वाबरोबरचं मराठीचा मुद्दा लावून धरा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

हिंदुत्वाबरोबरचं मराठीचा मुद्दा लावून धरा, राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी गुढीपाडवण्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्क येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र आगामी मुंबई, नाशिक, पुण्यासह इतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे, याच सर्व घडमोडींवर चर्चा करण्यासाठी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाबरोबरचं मराठीचा मुद्दा लावून धरा, असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. तसेच मराठी माणसाची मनसे मला पुन्हा दिसली पाहिजे. मराठीबाबत ठराविक नेत्यांनी न बोलता सर्वांना बोला, शिवजयंती आणि गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आवाहन देखील त्यांनी मनसैनिकांना केले आहे.

वांद्र्यातील एमआयजीमध्ये झालेल्या या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याला मनसे शिवतीर्थावर मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. या बैठकीस मोठ्या संख्येने मनसेचे नेते, सरचिटणीस, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. 21 मार्चला मनसे शिवाजी पार्कवर तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. राज्यातील पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे यंदा गुढीपाडवा सण मोठ्या दणक्यात साजरा करणार आहे. त्यामुळे मनसेची ही बैठक अधिक महत्त्वाची मानली जात आहे. मनविसेचे नवनियुक्त अध्यक्ष अमित ठाकरे हेदेखील या बैठकीस उपस्थित होते.

- Advertisement -

महापालिका निडणुकांबाबत बाळा नांदगावकरांचे मोठं विधान

महापालिका निवडणुका केव्हा होणार माहित नसले तरी निवडणुका होऊ शकतात अशाप्रकारे गृहित धरून निवडणुकांची तयारी पूर्णपणे करायची आहे, ताकदीने करायच्या आहेत अशा सुचना देण्यात आल्या. वाट पाहा थांबा, कारण लवकरचं ट्रेलरचे पिक्चरमध्ये रुपांतर झालेले दिसेल.

“सोबत आले तर सोबत नाही तर दिले सोडून” 

या बैठकीनंतर बोलताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजप युतीबाबत मोठं विधान केल आहे. “सोबत आले तर सोबत, नाही आले तर सोडून आम्हाला काम करत करायचेच आहे”, असं विधान त्यांनी केलं आहे. ते पुढे म्हणाले की, “राज ठाकरे जिथे तिथे गर्दी हे समीकरणचं आहे, त्यांना निबंध देण्याची गरज लागत नाही. राज ठाकरे जिथे येतात तिथे गर्दी आपोआपचं येते. आत्तापर्यंत मनसेचं एकटा जीव आणि सदाशिवचं चालल आहे. मात्र भाजप युतीबाबत माध्यमं चर्चा करत आहे”.

- Advertisement -

दरम्यान यंदा मुंबई, नाशिक आणि पुणे महानगपालिकेसह राज्यातील इतर महापालिकांवर मनसेचा झेंडा फडवण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि पुत्र अमित ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत. मुंबईपासून ते राज्यातील अनेक जिल्ह्यात मनसेच्या नवीन शाखांचे त्यांनी उद्धाटन सुरु केले आहे. तर अनेक वेळा मनसेच्या नेते, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे यंदा मनसे मोठ्या ताकदीने पुन्हा पालिका निवडणुकींच्या मैदानात उतरत काम करत आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -