Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या ‘WhatsApp Chatbot’ सुविधेचे लोकार्पण

आता बृहन्मुंबई महानगरपालिकेव्दारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सुविधांची माहीती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. या सेवा सुविधांची माहीती नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपव्दारे, 8999-22-8999 या व्हॉट्सअप नंबरवर सहजपणे उपलब्ध होणार आहे.

Mumbai: Mumbai Municipal Corporation's 'WhatsApp Chatbot' facility launched
Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या ‘WhatsApp Chatbot’ सुविधेचे लोकार्पण

आता बृहन्मुंबई महानगरपालिकेव्दारे देण्यात येणाऱ्या विविध 80 पेक्षा अधिक सुविधांची माहीती नागरिकांना एका क्लिकवर मिळणार आहे. या सेवा सुविधांची माहीती नागरिकांना त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपव्दारे, 8999-22-8999 या व्हॉट्सअप नंबरवर सहजपणे उपलब्ध होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण आज शुक्रवारी १४ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, माननीय पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या माननीय महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईतील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी व मनपा पदाधिकारी, तसेच  महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे आणि व्हॉटस्ॲपचे संचालक (सार्वजनिक धोरणे) शिवनाथ ठुकराल आदी मान्यवर दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे याप्रसंगी उपस्थित राहतील.कोविड १९ विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे, सदर कार्यक्रम पूर्णतः दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडणार आहे.

 


हेही वाचा – माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व आणि संघ समर्थ, चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर