घरताज्या घडामोडीमुंबई मनपाचे बजेट ९० हजार कोटींनी सरप्लस, या ठेवींवर काहींचा डोळा - आदित्य ठाकरे

मुंबई मनपाचे बजेट ९० हजार कोटींनी सरप्लस, या ठेवींवर काहींचा डोळा – आदित्य ठाकरे

Subscribe

'90 हजार कोटींचे सरप्लस आपले बजेट आहे. या ठेंवीवर काहीचा डोळा आहे', अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुंबईतल्या वरळी येथील जांभोरी मैदानात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित आदित्य ठाकरे यांनी केले.

’90 हजार कोटींचे सरप्लस आपले बजेट आहे. या ठेंवीवर काहीचा डोळा आहे’, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मुंबईतल्या वरळी येथील जांभोरी मैदानात ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित आदित्य ठाकरे यांनी केले. कार्यकर्त्यांना संबोधताना ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्यावर गटावर निशाणा साधला. (Mumbai municipal budget surplus by 90 thousand crores some eyes on these deposits Aditya Thackeray)

‘महापालिका आपल्या हातात आली तेव्हा, ती 600 कोटींच्या तोट्यात होती. आता 90 हजार कोटींचे सरप्लस आपले बजेट आहे. या ठेंवीवर काहीचा डोळा आहे. हा मुंबईकरांचा पैसा आहे, त्यांच्यासाठी तो वापरला जायला हवा’, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

- Advertisement -

‘आता सत्तेत जे गद्दार, बापचोर आणि अलीबाबा बसलेले आहेत, हे सरकार कोसळणारच. हे आधी ईडी सरकार होते. आता ते बीसी म्हणजे बिल्डर आणि कॉन्टॅक्टर सरकार झाले आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. आता त्यांचे सगळे चोरून झाले आहे. आता ठाकरे आडनाव ते चोरणार का?’, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.


हेही वाचा – ‘ये डर अच्छा है…’, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -