घरताज्या घडामोडीमुंबई पालिका आयुक्तांचे कोविडबाबत राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठांना मार्गदर्शन

मुंबई पालिका आयुक्तांचे कोविडबाबत राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठांना मार्गदर्शन

Subscribe

मुंबईतील वाढलेल्या कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळविल्याने त्याची योग्य दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयानेही पालिका आयुक्त इकबाल चहल यांचे विशेष कौतुक

कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव मुंबई महापालिकेने कशाप्रकारे विविध उपाययोजना करून नियंत्रणात आणला, त्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा आदींनी कसे अथक परिश्रम घेतले याबाबतचे मौलिक मार्गदर्शन मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी सोमवारी राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱयांना केले. मुंबईतील वाढलेल्या कोरोनावर यशस्वीपणे नियंत्रण मिळविल्याने त्याची योग्य दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयानेही पालिका आयुक्त इकबाल चहल यांचे विशेष कौतुक करीत त्यांचा आदर्श इतर महापालिकांनी,तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि इकबाल चहल यांनी त्यांना मार्गदर्शन करावे, असे न्यायालयाने म्हटले होते.

मुंबई महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात सदोदित सूक्ष्मस्तरीय नियोजन अव्याहतपणे करण्यात येत आहे. यामध्ये घर, सोसायटी, रस्ता, गल्ली अशा सर्वच बाबींचा विचार करुन नियोजन करण्यात येत आहे. तसेच, सध्या मुंबईत दररोज सरासरी सुमारे ४५ हजार व्यक्तिंची कोविड चाचणी केली जाते. तसेच ज्या व्यक्तिंच्या चाचणी अहवाल कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे, अशा व्यक्तिंच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंचे ‘Contact Tracing’ देखील केले जाते. यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होते, असे आयुक्त इकबाल चहल यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत ‘चेस द वायरस’ आणि ‘ट्रेसिंग – टेस्टींग – ट्रॅकींग – ट्रिटिंग’ या चतु:सूत्री आधारित उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तिंचे अलगीकरण (विलगीकरण) करणे, आवश्यकतेनुरुप संशयितांच्या व बाधितांच्या कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर ‘सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार’ अर्थात ‘मेडिकल प्रोटोकॉल’नुसार औषधोपचार करण्याचा समावेश आहे.

महापालिका क्षेत्रातील ज्या रुग्णांना रुग्णालयात किंवा कोरोना काळजी केंद्रात (Corona Covid Centre) दाखल होण्याची आवश्यकता आहे, अशा नागरिकांसाठी महापालिकेने अत्यंत अल्पावधीत विविध ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध केल्या. तसेच अनेक ठिकाणी पूर्णपणे नव्याने जंबो कोविड सेंटरची उभारणी देखील केली.
ज्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड आहेत, अशा सर्व रुग्णालयांना वेळच्या-वेळी प्राणवायू पुरवठा उपलब्ध व्हावा, या दृष्टीने महापालिकेच्या स्तरावर सर्व २४ विभागांसाठी समन्वय अधिका-यांची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर या दृष्टीने सूक्ष्मस्तरीय नियोजन – समन्वयन – व्यवस्थापन साध्य करता यावे आणि केंद्र शासन, राज्य शासन व ऑक्सिजन पुरवठादार कंपन्या यांच्याशी वेळोवेळी सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने देखील सातत्यपूर्ण कार्यवाही अविरतपणे करण्यात येत आहे.

- Advertisement -

पालिका रुग्णालयांमध्ये प्राणवायुची उपलब्धतता अधिक सुलभतेने व्हावी, या दृष्टीने महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या क्षमतेचे पी.एस.ए. तंत्रावर आधारित ऑक्सीजन प्लांट कार्यरत आहेत. तर या व्यतिरिक्त आणखी १२ ठिकाणी पी.एस.ए. तंत्रावर आधारित ऑक्सीजन प्लांट करणारे प्रकल्प उभारण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या २४ विभागांमध्ये अव्याहतपणे कार्यरत असणा-या प्रत्येक वॉर्ड वॉर रुम मध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सहाय्यक इत्यादी दिवसाचे २४ तास कार्यरत असतात. त्याचबरोबर प्रत्येक वॉर्ड वॉर रुमसाठी साधारणपणे प्रत्येकी १० एवढ्या संख्येने रुग्णवाहिका कार्यरत आहेत, असे आयुक्त यांनी सांगितले.

या अंतर्गत प्रामुख्याने ५० फिरते दवाखाने विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणीकरुन बाधितांचा शोध घेतात. यानुसार गरज असणा-या भागांमध्ये २ ते ३ आठवडे मिशन मोडमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येतो.
‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी नागरिकांच्या स्तरावर जाणीवजागृती करणे, नागरिकांना घराबाहेर पडण्याची गरज भासू नये, यासाठी जीवनावश्यक बाबींची उपलब्धता करून देण्याची कार्यवाही करणे आदी बाबींची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे.

झोपडपट्टी परिसरांसह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण दिवसातून अनेकदा केले जात आहे. तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर असण्याकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरविण्यात येत आहे
मुंबई महापालिका क्षेत्रातील बेघर, भिक्षेकरी, देहविक्रय व्यवसाय करणा-या व्यक्ती, तृतीय पंथीय यांना लॉकडाऊन काळात अन्नधान्य मिळविण्यात अडचणी येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन अशा सर्व व्यक्तिंना अन्नधान्य किट किंवा जेवण पुरविण्याचे कार्य देखील महापालिकेद्वारे करण्यात आले.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची परिणामकारकता वाढविण्यासाठी पालिकेने मास्क वापरण्याबाबत जनजागृती केली व क्लिनअप मार्शलमार्फत ठिकठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.


हेही वाचा – बेस्ट समिती बैठकीत भाजपचा सभात्याग; बेस्टला पूर्णवेळ महाव्यवस्थापक देण्याची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -