घरमुंबईमुंबईतील ६ गिरण्यांच्या भूखंडांच्या आरक्षणात बदल, नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या

मुंबईतील ६ गिरण्यांच्या भूखंडांच्या आरक्षणात बदल, नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या

Subscribe

मुंबई महापालिकेने २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईचा नवीन विकास आराखडा (Mumbai new development plan) तयार केला आहे. त्यावर हरकती व सूचना मागवून व त्यावर सुनावणी झाल्यावर सर्वांच्या संमतीने विविध भूखंडांवर आरक्षण टाकले आहे. मात्र आता काही महत्वाच्या भूखंडांचे आरक्षण बदलण्यात येत आहेत.

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) परळ, शिवडी, माहिम (Paral, Shivdi, Mahim) येथील गिरण्यांच्या ५ भूखंडांचे आरक्षण निवासी पट्ट्यातून बदलून ( changed the reservation of plots of mills) उद्यानांसाठी आरक्षित केले आहेत. तर परळ – शिवडी येथील एका गिरणीच्या भूखंडांचे उद्यानासाठी असलेले आरक्षण बदलून ‘निवासी’ पट्ट्यात केले आहे. आता त्यावर नागरिकांकडून एका महिन्यात हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

२० वर्षांसाठी विकास आराखडा

- Advertisement -

मुंबई महापालिकेने २०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईचा नवीन विकास आराखडा (Mumbai new development plan) तयार केला आहे. त्यावर हरकती व सूचना मागवून व त्यावर सुनावणी झाल्यावर सर्वांच्या संमतीने विविध भूखंडांवर आरक्षण टाकले आहे. मात्र आता काही महत्वाच्या भूखंडांचे आरक्षण बदलण्यात येत आहेत. कधी कधी हे भूखंड आरक्षण बदल चांगल्या हेतूने केले जातात. बऱ्याचदा भूखंडाच्या आरक्षण बदलामागे कधी कधी ‘अर्थकारण’ दडल्याचे बोलले जाते.

गिरणी कामगार देशोधडीला

- Advertisement -

मुंबईत अनेक वर्षांपूर्वी गिरण्या चालू होत्या. लाखो मुंबईकरांना त्यामुळे रोजगार मिळत होता. मात्र त्यानंतर गिरण्यांमध्ये  संप झाला. संप दीर्घकाळ चालला. काळाच्या ओघात एक एक करून जवळजवळ बहुतेक सर्व गिरण्या बंद पडल्या. गिरणी कामगार देशोधडीला लागले. या गिरण्यांच्या जागांवर गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळाली नाहीत. सरकार म्हणते की, गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी जागाच नाही. मात्र दुसरीकडे, मुंबईतील परळ, शिवडी, माहिम येथील ७ गिरण्यांच्या भूखंडांचे आरक्षण ‘निवासी पट्टा’ म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आले होते.

७ पैकी ६ भूखंडांच्या आरक्षणात बदल

आता त्या ७ भूखंडांपैकी भायखळा येथील हिंदुस्थान मिल भूखंडाचे आरक्षण ‘मनोरंजन मैदान’ असे विकास आराखड्यात नोंद असून ते तसेच ठेवून उर्वरित ६ भूखंडांचे आरक्षण बदलण्यात आले आहेत. यामध्ये परळ- शिवडी येथील एम.एस.टी. सी. गिरणी, काळाचौकी येथील मफतलाल गिरणी आणि लोअर परळ येथील व्हिकटोरिया गिरणी या तिन्ही गिरण्यांचे आरक्षण ‘निवासी पट्टा’ म्हणून नोंद असताना त्यात बदल करून ते तिन्ही भूखंड ‘मनोरंजन मैदान’ म्हणून आरक्षित करण्यात आले आहेत. तसेच, लोअर परळ येथील मातुल्य गिरणी व माहिम येथील हिंदुस्थान गिरणी या दोन्ही गिरण्यांचे आरक्षण ‘निवासी पट्टा’ म्हणून नोंद असताना त्यात बदल करून ते तिन्ही भूखंड ‘बगीचा व उद्यान’ यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. तर परळ – वेस्टर्न इंडिया लि. शिवडी येथील ‘एम.एस.टी. सी. गिरणीचे आरक्षण ‘मनोरंजन मैदान’ साठी आरक्षित करण्यात आले असताना त्यात बदल करून ते ‘निवासी पट्टा’ म्हणून करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेची मंजुरी

एकूण ५ भूखंडांचे आरक्षण निवासी पट्ट्यातून बदलून उद्यानांसाठी आरक्षित केले आहेत. तर परळ – शिवडी येथील एका भूखंडांचे उद्यानासाठी असलेले आरक्षण बदलून ‘निवासी’ पट्ट्यात केले आहे. त्यास मुंबई महापालिकेने १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मंजुरी दिली होती.आता त्यावर नागरिकांकडून एका महिन्यात हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या आरक्षण बदलावर राजकीय पक्ष, एनजीओ यांच्याकडून हरकती व सूचना जास्त प्रमाणात दाखल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -