Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईतून वर्षभरात ५ हजार १३५ कोटींची मालमत्ता कर वसुली

मुंबईतून वर्षभरात ५ हजार १३५ कोटींची मालमत्ता कर वसुली

अंधेरी, सांताक्रूझ भागात सर्वाधिक मालमत्ता कर वसुली

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेने उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी दंडात्मक कारवाईचा बडगा दाखवत वसूल केली आहे. वर्षभरात ५ हजार २०० कोटी रुपयांची वसुली अपेक्षित असताना कर निर्धारक व संकलक खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी ५ हजार १३५ कोटी रुपयांची म्हणजे ९८ टक्के रक्कम वसूल केल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

गेल्यावर्षी ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीपोटी ४ हजार १६१ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. तर ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ५,१३५.४३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात मालमत्ता करापोटी आतापर्यंत केलेली सर्वात मोठी वसुली असल्याचा दावा पालिकेने केला आहे, अशी माहिती सह आयुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे.

- Advertisement -

यंदा अंधेरी (पूर्व ) या भागामधून मालमत्ता करापोटी ५४०.२८ कोटी रुपये इतकी वसुली झाली आहे. अंधेरी (पश्चिम) येथे ४५४.५२ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे. तसेच, वांद्रे (पूर्व) विभागात ४११.२५ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे. वरळी विभागामध्ये मालमत्ता करापोटी ३९९.२९ कोटी रुपये आणि भांडुप परिसरामधून समावेश ३०३.६८ कोटी इतकी मालमत्ता कर वसुली झाली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये, २,५४५.९४ कोटी रुपये, शहर भागात १,५०९.५२ कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमध्ये १,०७६.९३ कोटी रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे .

पालिकेने, मालमत्ता कर वसुलीसाठी वाहने ,वस्तू यासारखी जंगम मालमत्ता जप्त करणे, नळ जोडणी तोडणे यासारख्या विविध स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ११ हजार ६६१ मालमत्तांवर अटकावणीची कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

 

- Advertisement -