घरताज्या घडामोडीमुंबई महानगरपालिकेची धडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २५ लाखांची दंडवसुली

मुंबई महानगरपालिकेची धडक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून २५ लाखांची दंडवसुली

Subscribe

पालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असताना रस्त्यावर थुंकून घाण करणाऱ्या १२ हजारपेक्षाही जास्त नागरिकांकडून गेल्या ६ महिन्यात तब्बल २४ लाख ८९ हजार १०० इतकी रक्कम दंडात्मक कारवाईद्वारे वसूल करण्यात आली आहे. यामध्ये, सर्वाधिक ३ लाख ५२ हजार ६०० रुपये एवढी दंड वसुली कुर्ला विभागातून करण्यात आली आहे. त्या खालोखाल ‘सी’ विभागामधून ३ लाख २९ हजार ८०० रुपये , त्यानंतर ‘ए’ विभागात २ लाख ३४ हजार ८०० रुपये एवढी रक्कम दंड वसुली करण्यात आली आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रस्त्यावर वा सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोनासारख्या इतर रोगांचा प्रसार होण्याची शक्यता असते. तसेच, थुंकल्याने रस्ते, सार्वजनिक जागा खराब दिसते. त्यामुळे पालिकेच्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी २०० रुपये दंड करण्यात येतो. याप्रमाणे,पालिकेने गेल्या सहा महिन्यात १२ हजार पेक्षाही जास्त नागरिकांकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे २४ लाख ८९ हजार १०० इतकी रक्कम दंडात्मक कारवाईद्वारे वसूल केली आहे.

- Advertisement -

दंड रकमेची माहिती खालीलप्रमाणे

# ‘ए’ विभाग -: ३,२९,८०० रुपये

- Advertisement -

# ‘बी’ विभाग -: १,३१,००० रुपये

#’सी’ विभाग -: २,३४,८०० रुपये

# ‘डी’ विभाग -: ६६,४०० रुपये

# ‘ई’ विभाग -: २०,००० रुपये

# ‘एफ/दक्षिण’ विभाग -: २,१७,४०० रुपये

# ‘एफ/उत्तर’ विभाग -: ५०,६०० रुपये

# ‘जी/दक्षिण’ विभाग -: २६,००० रुपये

# ‘जी/उत्तर’ विभाग -: २५,९०० रुपये

# ‘एच/पूर्व’ विभाग -: १,७१,४०० रुपये

# ‘एच/पश्चिम’ विभाग -: २५,८००रुपये

# ‘के/पूर्व’ विभाग -: २७,००० रुपये

# ‘के/पश्चिम’ विभाग -: ९५,६०० रुपये

# ‘पी/दक्षिण’ विभाग -: ६९,८०० रुपये

# ‘पी/उत्तर’ विभाग -: १,७९,२०० रुपये

# ‘आर/दक्षिण’ विभाग -: ३३,५०० रुपये

# ‘आर/मध्य’ विभाग -: ४३,८०० रुपये

# ‘आर/उत्तर’ विभाग -: ९४,८०० रुपये

# ‘एल’ विभाग -:३,५२,६०० रुपये

# ‘एम/पूर्व’ विभाग -: १९,२०० रुपये

# ‘एम/पश्चिम’ विभाग -: १,०१,२०० रुपये

# ‘एन’ विभाग -: ७१,३०० रुपये

# ‘एस’ विभाग -: ९०,४०० रुपये

# ‘टी’ विभाग -: ११,६०० रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -